Mumbai Parking Issue : सावित्रीबाई फुले नाट्यगृह आवारात दुचाकीस नो एन्ट्री; गलथान व्यवस्थापनाचा रसिकांना फटका

डोंबिवली स्टेशन पासून हे नाट्यगृह लांब असल्याने 90 टक्के रसिक आपली वाहने घेऊन येतात.
Mumbai Parking Issue
Mumbai Parking IssueSakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू मानले जाते. नाटक पाहण्यासाठी रसिक श्रोते येथे जात असतात. मात्र शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या या नाट्यगृहात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची चांगली सुविधा नसल्याने रात्रीच्या प्रयोगाला रसिक आपल्या वाहनाने जाणे पसंत करतात.

मात्र तुम्ही दुचाकी घेऊन जात असाल तर विचार करा असे काही रसिक म्हणत आहेत. नाट्यगृहाच्या आवारात केवळ चारचाकी वाहने उभी करण्यास परवानगी दिली जाते. दुचाकी नाट्यगृहाच्या बाहेर तुमच्या जबाबदारीवर उभी करण्याचा सल्ला नाट्यगृह व्यवस्थापणाकडून दिला जात आहे. याविषयी विचारणा केली असता रसिकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप रसिक करत आहेत.

डोंबिवलीकर हे नाट्यप्रेमी असून नाटकांना येथून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेक नाट्यप्रयोग येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होत असतात. परंतू तसे पहायला गेले तर हे नाट्यगृह शहराच्या एका कोपऱ्यात असल्याने अनेक रसिकांना इच्छा असूनही प्रयोगाला जाता येत नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे शहरापासून लांब, रात्रीच्या वेळेस सार्वजनिक वाहतूकीची पुरेशी सुविधा नाही, तसेच नाट्यगृहाचा रस्ता हा निर्मनुष्य असल्याने अनेक दर्दी रसिक येथे येणे टाळतात. त्यातही ज्यांच्याकडे खासगी वाहनांची सोय आहे असे रसिक नाट्यप्रयोगांना गर्दी करत असतात. परंतू नाट्यगृह व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा फटका या रसिकांना बसत आहे.

Mumbai Parking Issue
Mumbai Crime : गुन्हेगाराने पत्रकारावर दगड भिरकवत केली शिवीगाळ ; व्हिडिओ व्हायरल...

डोंबिवली स्टेशन पासून हे नाट्यगृह लांब असल्याने 90 टक्के रसिक आपली वाहने घेऊन येतात. गेल्या काही महिन्यांपासून चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाट्यगृहात सुरू आहे. पण दुचाकी वाहनांसाठी पार्किंग बंदी आहे. यामुळे रस्त्यावर दुचाकीस्वार आपली वाहने पार्क करतात. अनेकदा येथे उभ्या असलेल्या दुचाकी मधून पेट्रोल चोरीला जाणे, वाहनांचे आरसे चोरीला जाणे, दुचाकींची मोडतोड असे प्रकार सर्रास होत असतात.

नाट्यगृह आवारात दुचाकी उभी करण्यास परवानगी दिली जात नसल्याने रसिक श्रोते नाराज आहेत. याविषयी जाब विचारल्यास व्यवस्थापनाकडून उद्धट वर्तन केले जात असल्याचा आरोप रसिक करत आहेत.

Mumbai Parking Issue
Mumbai-Goa highway : पहिल्या पावसानेच अवस्था दयनीय, मुंबई-गोवा महामार्गावर आज जनआक्रोश

असाच प्रकार शनिवारी नाट्य पहाण्यास आलेल्या स्वप्निल नार्वेकर यांच्या सोबत घडला आहे. रात्री 8 वाजता ते नाटक पहाण्यास आले असता त्यांना दुचाकी आतमध्ये पार्क करता येणार नाही असे सांगितले गेले. त्याबद्दल त्यांनी नाट्यगृहाचे दत्तात्रय लधवा यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी उर्मट वर्तन केल्याचे स्वप्निल यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळेस रस्त्यावर अंधार असतो. पावसाचे दिवस असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर शेवाळ आलेले आहे. येथे घसरणीचा रस्ता आहे.

Mumbai Parking Issue
Mumbai News : कल्याण-डोंबिवलीत बेकायदा बांधकामे, नियंत्रणासाठी 77 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

अंधारात एखाद्या व्यक्तीसोबत काही अपघात होऊन ते पडल्यास जबाबदारी कोणाची. नाट्यगृह आवारात जागा असतानाही दुचाकी पार्किंग का करु दिली जात नाही. आम्ही तिकीट काढून नाट्यप्रयोगाला येतो मग केवळ चारचाकी वाहनांनाच का पार्कींग करु दिले जाते असा सवाल स्वप्निल यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधी व्हिडीओ रेकॉर्ड केला असून पालिका प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे म्हणने देखील त्यांनी मांडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.