नवी दिल्ली- ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटलंय की, 'टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांमध्ये नाराजी आहे. येणारा काळ कठीण आहे अशी त्यांची भावना आहे.' यावर शरद पवार म्हणालेत की, कोणत्याही खासदाराला निवडणूक नको आहे. असं काही गडबड झाली तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. निवडणुकाला सामोरे जायला सगळ्यांनाच त्रास होतो. ऊन, वाऱ्यात प्रचार करावा लागतो. त्यामुळे नको रे बाबा निवडणूक अशी सगळ्यांची भावना आहे.
आमचं लक्ष्य एकच आहे. ते म्हणजे विधानसभेची निवडणूक. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही सोबत लढणार आहोत. आम्हाला लोकसभेमध्ये जनतेने चांगला प्रतिसाद दिला. आमच्या सहकाऱ्यांची विधानपरिषदेला आम्ही दखल घेणार आहोत. त्यांना देखील चांगल्या जागा देण्यात येतील, असं पवार म्हणाले
लोकसभा निवडणुकीनंतर लोकांनी सर्वांनाच जागा दाखवली आहे, असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'आमचे पाय जमिनीवरच आहेत.' वारीबाबत बोलताना पवार म्हणाले की, 'वारी माझ्या गावावरून जाते. एका दिवशी मी त्यासाठी थांबणार आहे. वारकऱ्यांचे मी स्वागत करेन.;
तीन महिने हातात आहेत. राज्यात आज बदलाची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नव्या पक्षातील नेते मला भेटायला येत असतात. पिंपरी चिंचवडमधील अनेक नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे. नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असं पवारांनी स्पष्ट केलं.
भारतीय संघाने अद्भूत प्रकारचा कारनामा केला. धावा कमी काडायच्या होत्या, पण शेवटी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि १७ वर्षांनंतरचा गॅप भरून काढला. टी-२० वर्ल्डकप जिंकला. राहुल द्रविड यांनी संघाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी भारतीय संघाचा, राहुल द्रविड यांचं आणि इतर सहकार्यांचं अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.