राज ठाकरेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही - शरद पवार

शिवरायांचे नाव घेत नाही हा आरोप खोटा असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
Sharad Pawar Raj Thackray
Sharad Pawar Raj Thackray
Updated on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार हे शिवाजी महाराजांचे नाव कधीच घेत नाही असा आरोप केला होता. त्यानंतर आज शरद पवार यांनी राज यांच्या आरोपांना उत्तर देत राज ठाकरे यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो असा आरोप केला जातो. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध तेव्हाही होता आणि आताही असल्याचे पवार म्हणाले. जेम्स लेनचे लिखाण गलिच्छ होते. त्याला ज्यांनी माहिती पुरवली ती योग्य नव्हती, असेदेखील पवार म्हणाले. (Sharad Pawar Reaction on Raj Thackeray Allegations)

Sharad Pawar Raj Thackray
'विश्वास नांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही'

शरद पवार म्हणाले की, शिवरायांना घडवण्यात राजमाता जिजाऊंचं योगदान असून, शिवरायांचे नाव घेत नाही हा आरोप खोटा असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शाहु, फुले, आंबेडकर यांचा उल्लेख ही शिवरायांच्या विचारांची मांडणी असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमाचीदेखील आठवण करून देत राज यांच्या कालच्या भाषणात सामान्यांचा एकही प्रश्न नसल्याची टीकादेखील पवार यांनी राज ठाकरेंवर केली असून, त्यांच्या भाषणात मूळ मुद्द्यांना बगल देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Sharad Pawar Raj Thackray
उत्तरसभेनंतर छगन भुजबळांचे पुत्र राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

महागाईबाबत राज ठाकरे गप्प का? असा सवाल देखील यावेळी शरद पवार यांनी केला आहे. तसेच प्रबोधनकार ठाकरे याचं लिखाण वाचण्याचादेखील सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष जातीय राजकरण करत असल्याच्या राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व विविध जातीच्या नेत्यांच्या हातात आहे. त्यामुळे जातीचं राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. भाषणात त्यांनी सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान पदासाठी आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता. आजही आम्ही एकत्र आहोत, असं ते म्हणाले. पवार म्हणाले की, राज्यात वीजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या अल्टिमेटवर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले...

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. मुंबईतील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरेच्या या वक्तव्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल. "महागाई, विकास इ. प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी देशात धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांप्रदायिक विचाराला प्रोत्साहन देण्याचं चित्र सध्या दिसत आहे. लोकांनी याला बळी पडू नये', असंही शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.