Eknath Shinde: "सुर्याचा कॅच कोणी विसरणार नाही तसंच आम्ही 50 जणांनी..."; CM शिदेंची राजकीय फटकेबाजी

T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचा सत्कार समारंभ आज विधानभवनात पार पडला.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shindeesakal

मुंबई : T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचा सत्कार समारंभ आज विधानभवनात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार आणि टीम इंडियाचे चार प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुख्यंमत्र्यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. सूर्याचा कॅच कोणी विसरणार नाही तसंच आम्ही ५० जणांनी केलेली कामगिरीही कोणी विसरणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. (No one will forget Surya Kumar Yadav catch as well as 50 of us wicket CM Eknath Shinde political lashing at Vidhan Bhavan)

मुख्यमंत्री म्हणाले, "राजकारण हे देखील क्रिकेटसारखंच आहे. कधी कुठे कधी कोणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही. सुर्यकुमारजी तुमचा कॅच जसा कोणीही विसरणार नाही तसंच आमच्या पन्नास जणांच्या टीमनं दोन वर्षांपूर्वी काढलेली विकेट देखील कधी कोणी विसरु शकणार नाही" गेली दोन वर्षे आम्ही सर्वजण बॅटिंग करतो आहोत. तुमच्या खेळानं जसा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसाच आनंद सुख समाधान राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तेच आम्ही काम करत असतो.

Chief Minister Eknath Shinde
Ajit Pawar : "सूर्यानं झेल घेतला नसता तर रोहित शर्मानंच नाहीतर आम्ही पण..."; अजित पवारांची विधान भवनात फटकेबाजी

राजकारण आणि क्रिकेटची सांगड मी घालत नाही पण मनापासून मी आपल्या सगळ्यांच्या यशस्वी खेळाला शुभेच्छा देतो. हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही. तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांचं ते प्रतिक आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Chief Minister Eknath Shinde
Lalu Yadav: ऑगस्टपर्यंतच चालणार मोदी सरकार; लालू प्रसाद यादव यांचा दावा

आश्वासन पाळावंच लागेल

"रोहितजी आपण सदैव हिट राहा, यादवजी आपण सूर्यासारखे तपळत राहा, जैयस्वालजी आपण सदैव यशस्वी व्हा आणि दुबेंच्या नावातच शिव आहे. त्यामुळं तुम्ही भारताची पताका अशीच फडकवत राहा," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाच्या या चार प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. आता सभागृहात तुम्ही आश्वासन दिलंय की पुढचा वर्ल्डकप जिंकू आता तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Chief Minister Eknath Shinde
Paper Leak Bill: पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर; मोठी शिक्षा अन् भारी दंड!

टीम इंडियाला ११ कोटींचं बक्षीस जाहीर

टीम इंडियाला राज्य सरकारच्यावतीनं प्रोत्साहन म्हणून ११ कोटी रुपये या ठिकाणी आम्ही घोषित करतो. रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की एमएमआरमध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. यासाठी जी काही आवश्यक मदत असेल ती सरकार आपल्याला करेल कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे आहात, असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com