KEM रुग्णालयावर ओढवली 'भीषण' परिस्थिती, वाचा KEM हॉस्पिटलच्या शवागारातील भीषण वास्तव...

KEM रुग्णालयावर ओढवली 'भीषण' परिस्थिती, वाचा KEM हॉस्पिटलच्या शवागारातील भीषण वास्तव...
Updated on

मुंबई : महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील शवागृह बंद करण्याची वेळ कर्मचार्यांवर आली आहे. कारण, शवागृहात काम करणारे सर्व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती कर्मचार्यांकडून देण्यात आली आहे. त्यामूळे, कोरोना रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांना कोण सुपूर्द करणार असा प्रश्न विचारला जात आहे. या विषयी रुग्णालय प्रशासनाकडून मात्र बंद असणार्या शवागृहाचे वृत्त धुडकावून लावण्यात आले आहे. 

शवागृहातील आतापर्यंत एकूण 10 हेल्थ वर्कर्स कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोणत्याही प्रकारची योग्य सुविधा रुग्णालय प्रशासनाकडून दिली नसल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. आतापर्यंत जे हेल्थ केअर वर्कर्स कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सध्या केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी भरले असुन आताच्या घडीला जवळपास 30 ते 40 कोरोना मृतदेह तसेच पडून आहेत. अश्या वेळेस सर्वच हेल्थ केअर वर्कर्सना कोरोनाची लागण झाल्याने मृतदेह कोण देणार असा सवाल ही कर्मचारी विचारतात. याआधी कोरोना वॉर्डमध्ये काम करणार्या एका कर्मचार्याच्या झालेल्या मृत्यूमुळे इतर कर्मचार्यांनी मिळुन काम बंद आंदोलन केले होते. तेव्हा ही कर्मचार्यांना सर्व प्रकारची सुविधा आणि आवश्यक ते सुरक्षात्मक पीपीई किट्स द्या अशी मागणी केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचार्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले होते.

कोरोना पॉझिटिव्ह नर्सेसचा अधिष्ठात्यांना घेराव- 

कोरोना रुग्णांची सेवा करताना डॉक्टर्स आणि नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. अशा वेळेस त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी केईएमच्या नर्सेसनी अधिष्ठात्यांना घेराव घातल्याचे सांगण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नर्सेसना क्वारंटाइन होण्याची कोणतीही सुविधा रुग्णालयात न केल्यामुळे घेराव घालण्यात आला होता. 

शवागृह कधीच बंद ठेवू शकत नाही. ते बंद ठेवले तर मृतदेहांच काय? काही हेल्थ केअर कर्मचारी जरुर पॉझिटीव्ह आले आहेत. पण, उर्वरीत मनुष्यबळासह शवागर 24 तास कार्यरत आहे असं KEM चे डीन डॉक्टर हेमंत देशमुख म्हणालेत. 

no space to keep bodies of demised covid 19 patients in KEM hospital health workers starts agitation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.