मुंबई : थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांवर (Thirty First december party) मुंबई महानगरपालिकेने (BMC) बंदी घातली आहे. तसे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसिध्द केले. या निमयांचे उल्लंघन (Breaking rules) करताना आढळल्यास साथ रोग नियंत्रण कायद्यासह विविध कायद्या अंतर्गत राेख दंडासह फौजदारी कारवाई (legal action) होणार आहे. तसेच, ते ठिकाणीही सिल केले जाऊ शकते. त्यामुळे आता घरात बसूनच पार्टी करावी लागणार आहे. (No celebration of thirty first December party as bmc order)
ववर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने शुक्रवारी संपूर्ण राज्यात कठोर नियमावली लागू केली आहे. तर, त्यातही स्थानिक प्रशासनाला गरजेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच निर्देश महानगरपालिकेने प्रसिध्द केले आहे. सभागृह तसेच खुल्या जागेत होणाऱ्या सर्व प्रकारच्या पार्ट्यांवर बंद आणण्यात आली आहे.
महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात दोन भरारी पथके तयार केली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे प्रभाग मोठे आहेत त्या प्रभागात भरारी पथकांची संख्या पाच पर्यंत वाढविण्यात येणार आहे. या भरारी पथकांमार्फत हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटवर तसेच इतर ठिकाणीही नजर ठेवण्यात येणार आहे. साथ रोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच इतर कायद्यानुसार नियम मोडल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यात फौजदारी कारवाई,दंड तसेच ठिकाणही सिल केले जाऊ शकते. नववर्षाच्या स्वागताला गल्ली बोळात, इमारतींच्या गच्च्यावरही पार्ट्या होतात. अशा पार्ट्यांवरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी या भरारी पथकांवर आहे, असेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.