Abhijit Panse : कोकण पदवीधर मतदार संघात १२ वर्षांत काम झालेच नाही; अभिजित पानसे यांचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदार संघासाठी अभिजित पानसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
Abhijit Panse
Abhijit Panseesakal

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघात मागील १२ वर्षात गटार, पायवाटां शिवाय पदविधरांसाठी ठोस काम झाले नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजित पानसे यांनी भाजपचे निरंजन डावखरे यांचे नाव न घेता केला.

Abhijit Panse
Crime News: बोगस पासपोर्ट असणाऱ्या त्या बांगलादेशींना झाला आठ वर्षांचा कारावास!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदार संघासाठी अभिजित पानसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर सोमवारी मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत, भाजपवर हल्ला बोल केला. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिला आहे. आमचा जाहीरनामा किंवा वचननाम नसेल तर आमचा या मतदार संघासाठी रोजगारनामा असेल असेही त्यांनी सांगितले.

या निवडणुकीत भाजपचा पाठींबा घेणार का असा सवाल केला असता आमचा पक्ष आदेशावर चालतो, मी मनसेकडून लढत आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले. आमची त्यांचेकडे चर्चा झाली नाही किंवा त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर चर्चा झालेली नसल्याची माहिती यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com