मुंबई- गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान लोकांमध्ये दिसणारा उत्साह जरा जास्तच होतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक गणेश मंडळे आपल्या लाऊड स्पीकरचा आवाज नियंत्रित ठेवत नसल्याचं समोर आलं आहे. काल रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मालाड वेस्टमधील एका लहान हॉस्पिटलमध्ये लाऊड स्पीकरचा दणदणाट ऐकायला मिळाला.
हॉस्पिटल असल्याने हा भाग सायलेन्स झोनमध्ये येतो. असे असताना या भागात आवाजाची मर्यादा ओलांडून लाऊड स्पीकर वाजवण्यात आले आहेत. संतापजनक म्हणजे ज्याच्यावर हे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते, त्यांनी मात्र यावर सोयीस्कर कानावर हात ठेवून घेतले आहेत. पत्रकार जित मशरू यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत संताप व्यक्त केला आहे.