Mumbai news : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकमांचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभव केला आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कष्टकरी लोक राहतात. कामगार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतो. अशावेळी सगळ्यांचच लक्ष या ठिकाणी असतं. (uttar madhya mumbai loksabha nikal )
काँग्रेसने या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवलं आहे. (loksabha election 2024)
विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदार संघ या लोकसभा मतदारसंघात येतात. ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला तर, या ठिकाणी तब्बल सात वेळा काँग्रेसचा विजय झाला आहे. मात्र 2014 नंतर या ठिकाणी मोदी लाटेमुळे भाजपचाच विजय झाला आहे. 2004 पासून ते 2019 पर्यंत या ठिकाणी दोन वेळा काँग्रेस तर दोन वेळा भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे.
2004 मध्ये या ठिकाणी एकनाथ गायकवाड खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2009 साली या ठिकाणी प्रिया दत्त निवडून आल्या. पुढे 2014 पासून ते 2024 पुनम महाजन या ठिकाणी खासदार होत्या.
2019 साली पुनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १ लाख ३० हजार मतांनी पराभव केला. पुनम महाजन यांना ४ लाख ८६ हजार मतं मिळाली तर प्रिया दत्त यांना ३ लाख 56 हजार मतं मिळाली. या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत.(priya datta)
मात्र जातीय सलोखा, बेरोजगारीचा प्रश्न, धार्मिक भावना, विद्यमान खासदारांचा मतदारांसोबत नसलेला संपर्क या सर्व गोष्टी या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.