Loksabha 2024: पियूष गोयल यांनी उत्तर मुंबईचा गड राखला आहे. यावेळी त्यांनी भूषण पाटलांवर मिळवला आहे. याची आधिकृत घोषणा आजून करण्यात आलेली नाही. गोयल यांना जवळ जवळ २ लाखांंची आघाडी मिळाली आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघ हा मुंबईच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली हे महत्त्वाचे परिसर येतात. या ठिकाणी मच्छीमारांची वस्ती मोठी आहे. अशावेळी या ठिकाणी मराठी, गुजराती ही मत महत्त्वाची ठरतात.
उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते. कारण 1989 पासून ते 2004 पर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राम नाईक हे तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. s
मात्र 2004 साली अभिनेता गोविंदा यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2009 साली ही जागा काँग्रेसकडेच राहिली. 2014 नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला.2019 साली गोपाळ शेट्टी यांना 7 लाख 66 हजार मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना 2 लाख 41 हजार 431 मत मिळाली. (Mumbai North lok sabha election 2024 winners list)
यंदा या ठिकाणी पियूष गोयल यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. तर भूषण पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. मच्छीमारांचे प्रश्न, मध्यमवर्गीय मतदारांचे प्रश्न, वाढती महागाई आणि बेरोजगारी हे या ठिकाणी निवडणुकीवेळी चर्चेत आलेले प्रश्न होते.(maharashtra politics)
गोपाळ शेट्टी यांना तिकीट नाकारल्यामुळे गोपाळ शेट्टींचे समर्थक चांगलेच नाराज असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे पियूष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास करू शकतील असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे या ठिकाणी सांगण्यात येत होतं. अखेर आज भूषण पाटलांवर पियूष गोयल यांनी विजय मिळवला आहे (mumbai loksabha)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.