मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईतील सर्वात मोठ्या देवनार कत्तलखान्यालाही झळ पोहोचली आहे. 3 जुलैला कत्तलखाना सुरु झाला, गेल्या 20 दिवसात कत्तलखान्यात एक बोकडही कापला गेला नाही किंवा एकही जनावर विक्रीसाठी आले नाही. त्यामुळे या काळात आरोग्य तपासणी शिवाय बोकड कापले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध मटणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे कत्तलखान्याच्या जाचक अटीमुळे काळ्या बाजारात बोकड हलाल केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मटण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे देवनारचा कल्लखाना बंद ठेवण्यात आला होता. देवनारमध्ये देशातील सर्वात मोठे पशू बाजारही भऱतो. दिवसाला इथ 25 हजार पशूंची खरेदी, विक्री होते. मात्र कोरोनामुळे पशुबाजार बंद करण्यात आला होता. त्या दरम्यान मुंबईत पशू खरेदी आणि मटण मार्केटचे बेकायदेशीर व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे 3 जुलै पासून कत्तलखाना सुरु होऊन देखील एकही एजंट, डिलर इथ फिरकला नाही.
जाचक अटींमुळे मांस विक्रेते, व्यावसायिकांनी मंडीवर बहिष्कार टाकला आहे. मटण विक्री सकाळ 7 वाजल्यापासून सुरू होते. सकाळी 11 वाजता कत्तखान्यात जाण्यात कसला फायदा आहे. दुपारी 2 पर्यंतच मटणाचे ग्राहक असतात. लोकांना ताजे मटण लागते. देवनार मध्ये जावून उशीर होतो. मग मांस स्टोर करण्यात काय अर्थ आहे बॉम्बे मटण डिलर असोसिएशनचे शहनाज ठाणावाला यांचा सवाल त्यांचा आहे.
काय आहेत जाचक अटी
कत्तलखाना बंद, ब्लॅक मार्केट सुरु
देवनार कत्तलखाना बंद असला तरी मुंबईतील मांस पुरवठ्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. सध्या बोकडाचे मटण किरकोळ बाजारात 550 रुपये प्रति किलो आहे. तर ठोक बाजारात त्याचा दर 480 रुपये प्रति किलो आहे. लॉकडाऊनच्या काळात देवनारचा पशु बाजार बंद होता. त्यामुळे शहरातील मटण व्यवसाय बेकायशीर व्यवहाराकडे अधिक झुकल्याचे ठाणावाला सांगतात.
मंडीमध्ये एकदा जनावर विक्रीसाठी आणले की ते मंडीबाहेर नेता येत नाही. मग या दरम्यान आमच्या शेळी, बकरीचा मृत्यु झाल्यास कोण जबाबदार राहणार? असा सवाल ऑल इंडीया शिप अँड गोट्स ब्रिडर आणि डिलर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अस्लम कुरेशी यांनी केला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टांरेट सुरु असतात तेव्हा मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारातूनचं मांस खरेदी केले जाते. तेव्हा हायजीन, आरोग्य या बाबी आडव्या का येत नाही, असा सवालही मांस व्यावसायिक गुलरेज कुरेशी यांनी केला आहे.
मटण स्वस्त का ?
कोरोना संसर्गाच्या काळातही राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुबईतील मटणाचे दर स्थिर आणि स्वस्त होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या पशूंवर आता एंट्री कर द्यावा लागत नाही. शिवाय देवनारमध्ये कत्तलीसाठी लागणारे शुल्क वाचल्यामुळे मटणाचे दर स्वस्त आणि स्थिर राहील्याचे मटण डिलरचे म्हणणे आहे. शिवाय शहरातील हॉटेल, रेस्टारेंट बंद आहेत. श्रावण सुरु झाल्यामुळेही मटण स्वस्त आहे. मात्र येणाऱ्या काळात हॉटेल, रेस्टारेंट सुरु झाल्यानंतर मटणाचे दर वाढू शकतात.
देवनार कत्तखाना विषयी थोडक्यात :
मुंबईतील पालिकेचा देवनार कत्तलखाना हा देशातील सर्वात मोठा मोठा कत्तखाना आहे. इथ दिवसाला 3000 बोकड, 300 म्हशी, 300 डूक्करांची कत्तल होते. मुंबईत मिळणारे बोकडाचे, म्हशीचे मास इथूनच कत्तल होऊन येत असते. या टिकाणी शासकीय नियमानूसार बोकड कापण्यापुर्वी रितसर आरोग्य तपासणी आणि इतर बाबी काटेकोरपणे तपासल्या जाते. स्वच्छतेचे सर्व नियम या ठिकाणी पाळले जातात. कोरोनाच्या काळात तर हे नियम अधिक काटेकोरपणे पाळले जातात.
कोरोनामुळे प्रतिबंधात्मक नियम
कोरोना संसर्गामुळे पशुवधगृह बंद ठेवावे लागले. 3 जुलै पासून काही अटी-शर्थींंसह इथले व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे परिसर स्वच्छ आणि सॅनिटाईज करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पशु विक्री बाजार बंद केला असून पशुवधगृहाचा वेळ कमी केला आहे. जनावरांना मंडीबाहेर न नेण्याच्या नियमामागे कोरोना संसर्ग रोखण्याचा विचार आहे असे देवनार कत्तलखान्याचे संचालक योगेश शेट्टे यांनी सांगितले.
( संपादन - सुमित बागुल )
not even single deal done done in deonar slaughter house questionmark onquality of meat
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.