Coronavirus : फक्त 2 मीटरचं सोशल डिस्टन्सिंग नाही तर वाऱ्याचा वेगही महत्वाचा, अमेरिकन संस्थेचा अहवाल

social distancing
social distancing
Updated on

मुंबई : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार विषाणूबाधेपासून वाचण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून केवळ दोन मीटरचे अंतर पुरेसे नाही. ताशी चार किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोरोना विषाणू सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या वतीने फिजिक्स ऑफ फ्लुईड्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे, की हवेची गती शून्य असताना माणसाच्या खोकल्यातून निघालेले तुषार दोन मीटरही लांब जाऊ शकत नाहीत. परंतु, वाऱ्याचा वेग ताशी चार ते 15 किलोमीटर असल्यास हे तुषार सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात.

वाऱ्याचा वेग ताशी 15 किलोमीटर असल्यास खोकल्यातील थुंकीचे तुषार 1.6 सेकंदांत सहा मीटर दूर जाऊ शकतात. त्यामुळे विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दोन मीटरचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही. गर्दीच्या ठिकाणी याचा मोठा परिणाम होऊ शकतो. वाऱ्याचा वेग अधिक असताना घराबाहेर पडणे टाळायला हवे. विशेषत: पावसाळ्याच्या आधी वेगाने वारे वाहत असताना अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. फेस शिल्ड, हॅंड ग्लोव्हज घालणेही महत्त्वाचे आहे.

अधिक संशोधन आवश्यक
घरातील वातावरणात खोकला अथवा शिंकेतील तुषारांचा परिणाम वेगळा होऊ शकतो. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या वातावरणात आणि हवामानाच्या स्थितीत अधिक अभ्यास केला पाहिजे, असेही या अहवालात म्हटले आहे.

not just social distance of 2 meters, but wind speed is also important, report of American organization

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.