मुंबई ः वाढत्या लॉकडाऊनमुळे केवळ स्थलांतरीत कामगारांनीच नव्हे तर दुकानदारांनीही गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदारांबरोबर काही रेस्टॉरंट मालकांनीही सध्या मुंबईला बायबाय करण्याचे ठरवले आहे.
अनेक मजूर गावाला निघून गेले आहेत. दुकाने बंद आहे, त्यामुळे तोटा वाढत आहे. या परिस्थितीत गावालाच जाणे चांगले असा विचार अनेकांनी केला आहे. मात्र यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानेही बंद होत आहेत. मीरारोडच्या शांतीनगर परिसरातील जीवनावश्यक वीस दुकाने बंद झाली आहे. लॉकडाऊन चारमध्ये ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने केवळ काही ग्राहकांसाठी दुकान सुरु ठेवून कमाई तर काहीच होत नाही असा विचार केल्याचे काही राजकीय कार्यकर्त्यांचे मत आहे.
किराणाच्या दुकानांबरोबर फरसाण, स्टेशनरी, मेडिकल शॉप असलेलेही गावी परतत आहेत, मुंबईपेक्षा गावाकडे सुरक्षित असू असे ते सांगतात. आता कदाचीत काही दुकानात माल दिसेल, पण ती भाडेतत्त्वावर दुकाने आहेत. त्यांना दुकाने परत करुन आपले डिपॉझिट हवे आहे. ते न मिळाल्यानेच वस्तू ठेवल्या आहेत. त्यांची दुकानाचे भाडे देण्याचीही तयारी नाही. करारच रद्द करण्यासाठी ते आग्रही आहेत, याकडे आपचे कार्यकर्ते नरेंद्र बम्बवानी यांनी लक्ष वेधले.
झवेरी बाजारातील सुवर्ण विक्रेत्याने राजस्थानला परत जाण्याचे ठरवले आहे. येथे काही काम नाही, त्यात कोरोना होण्याचा धोका आहे, त्यापेक्षा गावाकडे गेलेले चांगले असे मूळ राजस्थानमधील असलेल्या दिलीप जैन यांनी सांगितले. फोर्टमधील बॉम्बे रेस्टरंटचे मालकही केरळला गावी परतल्याचे सांगितले जात आहे. वाळकेश्वरला राहणारे पण खारघरला दुकान असलेल्यांनीही मुंबई सोडले आहे. चेंबूरच्या चामुंडा स्टोअरचे मालक जगदीश सिंग भानुजा यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांसह राजस्थानमधील गावात परतण्याचे ठरवले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.