Mumbai News : आता हवाई प्रवाशांना घेता येणार महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद; मुंबईत खास स्टॉल

Mumbai News
Mumbai News
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान प्रवाशांना महाराष्ट्रातील अस्सल स्वाद चाखता येणार आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने 'इकाई महाराष्ट्र' या अव्वल दर्जाच्या लग्झरी मिठाई व नमकीनच्या खाद्यपदार्थ स्टाल सुरू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला चालणार मिळणार आहे.

Mumbai News
Mumbai : गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीतील फसवणूक टळणार; महारेराकडून नियमावली जारी

आशियातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळ आहे. दररोज साडे आठशेपेक्षा जास्त विमानाचे उड्डाणे होता. दिवसेंदिवस विमानतळावरील प्रवासी संख्या सुद्धा वाढत जात आहे. त्यामुळे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इकाई महाराष्ट्र खाद्यपदार्थ स्टॉल मुंबई विमानतळावर सुरू करण्यात आले आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने याचे कंत्राट

वन क्लिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. ही कंपनी देशभरातील मिठाई, नमकीन, स्नॅक्स व अनोख्या पाककृती एकत्र आणण्याच्या व्यवसायात आहे. मुंबई विमानतळावर 'इकाई महाराष्ट्र' खाद्यपदार्थ स्टाल सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणारे प्रवासी आता प्रिझर्वेटिव मुक्त महाराष्ट्रीय स्वाद सर्वत्र घेऊन जाऊ शकणार आहेत.

Mumbai News
Tuljapur News: तुळजाभवानी भाविकांसाठी मोठी बातमी; तोकडे कपडे परिधान केल्यास मंदिरात प्रवेश नाही

सीएसएमआयएचे प्रवक्ता या खाद्यपदार्थ स्टॉल बद्दल म्हणाले, “मुंबई विमानतळावर इकाई महाराष्ट्र स्टॉल सुरू करणे आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातून बाहेर पडण्यापूर्वी, महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या व अनन्यसाधारण चवींचा आस्वाद घेण्याची संधी, इकाई महाराष्ट्र, प्रवाशांना देत आहे.

एक प्रवासीकेंद्री विमानतळ म्हणून प्रवाशांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. इकाई महाराष्ट्र हे स्टोअर सुरू झाल्यामुळे विमानतळावरील रिटेल उत्पादनांचे मूल्यवर्धन होईल व त्यात एक वैशिष्ट्य निर्माण होईल, असे आम्हाला वाटते.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()