आता बीएमसी करणार मृत्यूची ऑनलाईन नोंद; मृतांच्या संख्येतील गोंधळ दूर करण्यासाठी निर्णय..

hand
hand
Updated on

मुंबई: कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतील तफावत आणि मृत्यूच्या आकड्यातील गोंधळ दूर करण्यासाठी पालिकेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज च्या आकडेवारी नोंद करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून आजपासून गुगल फॉर्म मध्ये आकडेवारी नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व रूग्णालयांत आवश्यक प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक देखील गेल्या तीन दिवसात घेण्यात आली आहेत. आपल्याकडील कोरोना बाधित रुग्णांची माहीत 48 तासांच्या आत पालिकेला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जी रुग्णालये या निर्देशांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत देखील पालिका प्रशासनाने दिले आहेत.

पालिका प्रशासन देत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूबद्दलच्या माहिती मध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात 3000 हजाराहून अधिक मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यातील काही मृत्यू हे अगोदरचे असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हे मृत्यू नेमके कधीच आहेत याचा कोणताही खुलासा पालिकेने केलेला नाही. त्यामुळे पालिका कोरोना मृत्यूची लपवा लपवी करत असल्याची टीका होऊ लागली. विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर पालिकेने तांत्रिक बाबींकडे बोट दाखवत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पालिकेला त्या मृत्यूची नोंद कारावीच लागली होती.

राज्य सर्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी मुंबईतील प्रत्येक मृत्यूची नोंद करण्यास पालिकेला सांगितले आहे. त्यामुळे पालिकेला प्रत्येक मृत्यूची लिस्ट तयार करून ती राज्य सरकारकडे सुपूर्द करावी लागणार आहे. पालिकेला प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची माहिती त्याच्या पत्त्या सह विभाग निहाय द्यायची आहे. पालिका या निर्देशांसह आयसीएमआर च्या प्रत्येक निर्देशाचे पालन करणार असल्याचे ही पालिकेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

पालिकेला रुग्णांच्या मृत्यूची माहिती देणारी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांची यादी फार मोठी आहे. रुग्णालयांनी आपल्याकडील मृत्यूची नोंद 48 तासांच्या आत पालिकेकडे करायची आहे,मात्र असे होतांना दिसत नाही. 27 जून पर्यंत झालेल्या मृत्यूची नोंद 29 जून पर्यंत करण्याचे आदेश पालिकेने रुग्णालयांना दिले होते. 30 जून पर्यंत पालिकेकडे जी माहिती उपलब्ध होईल ती माहिती प्रसारित केली जाईल. जो माहिती उपलब्ध होईल त्याची छाननी करून पालिका ती राज्य सरकार ला देणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

विविध रूग्णालयांकडून मृत्यूची जी माहीती उपलब्ध होते ती सर्व माहिती राज्य सरकारकला कळविण्यात येत आहे. या माहितीची नोंद दररोजच्या प्रसिद्धी पत्रकात येत नसून त्याची नोंद वेगळी करण्यात येत असल्याचे ही पालिकेने स्पष्ट केले आहे. हे मृत्यू नेमके कधी झाले आहेत किंवा कोणत्या विभागात झाले आहेत हे सांगणे अवघड असल्याने या मृत्यूची नोंद दररोजच्या माहिती मध्ये समाविष्ट केली जात नाही.त्यामुळे या मृत्यूची माहिती नेहमीच्या मृत्यूंसोबत देता येत नाही शिवाय या माहितीचा नेहमीच्या मृत्यूदरावर देखील काहीही परिणाम होत नाही.

पालिकेने अगोदरच्या मृत्यूची नोंद करण्यास सुरुवात केली असून 17 जून रोजी 862 मृत्यूची नोंद केली आहे. लवकरच सर्व जुन्या मृत्यूंची पालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे दररोजच्या आकडेवारीत व्यतिरिक्त या मृत्यूंचा उल्लेख पालिका करत आहे. 28 जून रोजी 23 मृत्यू झाले , तर याच दिवशी जुन्या  64 मृत्यूंची नोंद ही करण्यात आली. 29 जून रोजी 21 मृत्यू झाले मात्र यादिवशी जुन्या 71 मृत्यूंची नोंद ही करण्यात आली. तर 30 जून ला 36 मृत्यू झाले,त्यादिवशी 56 जुन्या मृत्यूची नोंद झाली तर 1 जून रोजी 6 मृत्यूची झाले असून 69 जुन्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
now bmc will mark number of no more people online 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.