BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...
Updated on

मुंबई : धारावी सारख्या दाट वस्तीतील कोविड संक्रमणावर नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. आता हाच प्रयोग संपुर्ण राज्यात राबविण्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेत.

धारावीची लोकसंख्या 6 लाखावर असून स्थालांतरीत कामगार मिळून ही संख्या 8 लाख 50 हजारावर जाते. यातील 6 लाखाहून अधिक नागरीकांची पालिकेने प्राथमिक तपासणी केली. त्यात संशयीत 7 हजारहून अधिक संशयीत रुग्णांची चाचणी करुन त्यातील कोविड बाधित रुग्णांवर उपचार संपर्कातील व्यक्तींचे क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात आला. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृह, परीसराचे निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. या मायक्रो लेव्हल नियोजन करण्यात आले होते. 

याच धर्तीवर आता मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये कोविड प्रतिबंध उपाय केले जाणार आहेत. रुग्ण पालिकेकडे येण्यापुर्वी वैद्यकिय पथक त्यांच्यापर्यंत पेहचण्यावर आता भर दिला जाईल. 

वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केंद्राच्या ई उद्घटनाच्या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मालेगाव आणि धारावीत ट्रॅकिंग आणि टेस्टिंगचा प्रयोग यशस्वी झाल्याचे नमुद केले. त्यानुसार राज्यातील इतर भागांमध्येही आता कोविड प्रकिबंधाचे उपाय केले जाण्याची शक्यता आहे. 

now dharavi covid pattern will be used in rest of maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.