Shaktikanta Das : बँकांची आर्थिक परिस्थिती सुदृढ रिझर्व्ह बँकेच्या स्ट्रेसटेस्ट मध्ये पास

आर्थिक स्थिरतेसंदर्भात रिझर्व बँकेने घेतलेल्या स्ट्रेस टेस्ट मध्ये बँका उत्तीर्ण ; रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास
NPA falling Financial condition of banks RBI stress test passed Shaktikanta Das mumbai
NPA falling Financial condition of banks RBI stress test passed Shaktikanta Das mumbaiSakal
Updated on

मुंबई : देशातील बँकांचा एनपीए घसरत असून आर्थिक स्थिरतेसंदर्भात रिझर्व बँकेने घेतलेल्या स्ट्रेस टेस्ट मध्ये बँका उत्तीर्ण झाल्याची माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व बँकेच्या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट मध्ये दिली आहे.

शेड्युल्ड कमर्शियल बँकांचा ग्रॉस एनपीए सात वर्षांच्या निचांकी स्तरावर गेला आहे. तर त्यांचा नेट एनपीए सप्टेंबर मध्ये दहा वर्षांच्या नीचांकी स्तरावर म्हणजे १.३ टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे वर्षभरात आर्थिक स्थितीवर कितीही ताण आला तरी बँका त्याला समर्थपणे तोंड देऊ शकतील, असे अहवालात म्हटले आहे.

आर्थिक परिस्थितीवर कितीही ताण आला तरी किमान भांडवली निकष बँका पूर्ण करतील, असेही रिझर्व बँकेने म्हटले आहे. ४६ शेड्यूल्ड कमर्शियल बँकांपैकी सर्वजण हे निकष पूर्ण करतील असे दिसून येत आहे.

बँकांकडे कर्जासाठी मोठी मागणी येत आहे. त्याचा बँकांना फायदा होतो आहे तसेच त्यांचा नफा, भांडवल आणि रोखतरलता या बाबीही सुधारत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. औद्योगिक ग्राहकांनी घेतलेल्या कर्जापैकी बुडीत कर्जांचा दर कमी आहे.

तर हिरे दागिने व्यापार आणि बांधकाम या क्षेत्रासाठी हा दर मोठा आहे. मात्र गृह कर्ज आणि वाहन कर्ज यांच्या बुडीत कर्जाचा दरही फार कमी आहे. बड्या कर्जदारांनी घेतलेली कर्ज बुडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

एकूण ग्रॉस एनपीए मधील या कर्जांचा वाटा आधीच्या दोन वर्षात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त होता, तो आता ६२ टक्क्यांवर आला आहे. पुढील वर्षभरात बँकांचा ग्रॉस एनपीए आणखीनही कमी होईल असाही रिझर्व बँकेचा अंदाज आहे. मात्र अर्थव्यवस्थेची स्थिती ढासळली तरच हे प्रमाण वाढू शकते, असेही अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.