दादरकर काळजी घ्या, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

दादरकर काळजी घ्या, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
Updated on

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतल्या दादर माहिम या परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या अजूनही चिंता वाढवणारी आहे.  जी उत्तरमध्ये आज 107 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. धारावीमध्ये गुरुवारी दिवसभरात 15 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3102 इतकी झाली आहे.  194 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादर मध्ये गुरुवारी 51 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,386 इतकी झाली आहे. तर 548 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये गुरुवारी 41 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3080 इतकी झाली आहे. तर 540 ऍक्टिव्ह  रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात गुरुवारी 107 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 9,568 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 545 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,627, दादरमध्ये 2,722 तर माहीममध्ये 2,433 असे एकूण 7,782 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,282 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत रूग्णवाढीचा दर 1.14 वर

मुंबईत गुरुवारी 2,163 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,92,301 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.16 टक्क्यांवरून कमी होऊन 1.14 वर खाली आला आहे. मुंबईत गुरुवारी 54 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,655 वर पोहोचला आहे. मुंबईत गुरुवारी 1,550 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत गुरुवारी नोंद झालेल्या 54 मृत्यूंपैकी 38 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 39 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 54 रुग्णांपैकी 43 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. गुरुवारी 1,550 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,55,638 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 61 दिवसांवर गेला आहे. 23 सप्टेंबर पर्यंत एकूण 10,45,706  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.14  इतका आहे.

----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Number corona patients increased in Dadar Mahim Area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.