मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत असून राज्यातील रुग्णांची संख्या 5 हजाराच्या पुढे गेल्याने राज्यापुढील चिंता वाढली आहे. आज राज्यात 552 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या 5218 झाली आहे. आज राज्यात 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज 150 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण 722 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
आज राज्यात झालेल्या मृत्यूमध्ये मुंबई येथील 12, पुण्यातील 3, ठाण्यातील 2, सांगलीतील 1 आणि पिंपरी-चिंचवड येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. त्यात 10 पुरुष तर 9 महिलांचा समावेश असून 60 वर्षे किंवा त्यावरील 9 रुग्ण आहेत, तर 9 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 1 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 83,111 नमुन्यांपैकी 77,638 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले, तर 5218 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यातून 722 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 99,569 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 7,808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सॅनिटायझेशन टनेलवर बंदी
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जंतुरोधक रसायने फवारण्यासाठी सॅनिटायझेशन डोम अथवा टनेलचा वापर होताना दिसत आहे. मात्र टनेलच्या वापरास कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यक्तीवर अशाप्रकारे जंतुरोधक रसायने फवारणे शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या हानीकारक असून त्यामुळे संसर्ग रोखता येतो, हे सिध्द करणारा कोणताही पुरावा नाही. क्लोरिन किंवा इतर काही रसायने शरीरावर फवारल्याने डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज येणे, काही वेळा मळमळल्यासारखे वाटणे अथवा उलटी होणे असे परिणाम होऊ शकतात.
-------------
अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
महामुंबईतील रुग्णांचा तपशील
1)मुंबई महानगरपालिका - 3451 (मृत्यु 151)
2)ठाणे - 22 ( 2)
3)ठाणे मनपा - 150 (4)
4)नवी मुंबई मनपा - 94 (3)
5)कल्याण डोंबवली मनपा - 93 (2)
6)उल्हासनगर मनपा - १
7)भिवंडी निजामपूर मनपा - 6
8)मीरा भाईंदर मनपा- 81 (2)
9)पालघर - 18 (1)
10)वसई विरार मनपा - 111 ( 3)
11)रायगड - 16
12)पनवेल मनपा - 34 (1)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.