महापालिकेचे बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्यांची प्रकरणं सर्वात जास्त
मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावर (Mumbai Local) फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी आहे. त्यामुळे बनावट ओळखपत्र (Fake ID Cards) घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. यात सर्वाधिक संख्या महापालिकेचे (BMC) बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करण्याची आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने 28 एप्रिल ते 9 मे पर्यंत 648 प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्यावर 3 लाख 24 हजारांचा दंड ठोठावला आहे. यासह त्यांच्याकडील बनावट ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले. (Number of People Travelling in Mumbai Local Trains with Fake ID Cards Increases in May)
सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत 1 फेब्रुवारीपासून लोकल प्रवास करण्यास मुभा मिळाली होती. यावेळी बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र, आता सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंद झाला आहे. त्यामुळे पुन्हा बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढला आहे. मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने 28 एप्रिलपासून बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. 28 ते 30 एप्रिल या दरम्यान वाणिज्य विभागाने एकूण 160 बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पकडून 80 हजारांची दंड वसूली केली. तर, 28 एप्रिल ते 9 मे पर्यंत 648 प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्यावर 3 लाख 24 हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील प्रत्येक प्रवाशांकडून 500 रुपयांची दंड वसूली करण्यात आली आहे.
15 जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. यावेळी 31 जानेवारी 2021 पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास सुरू केला नव्हता. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रस्ते प्रवास करताना बराच मनस्ताप सहन करावा लागत होता. यासाठी काहींनी बनावट ओळखपत्राचा आधारही घेतला. परंतु अशा प्रवाशांची रेल्वे तिकीट तपासनीस, रेल्वे पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. स्थानकात प्रवेशाआधी तिकीट, ओळखपत्राची तपासणी करतानाच बनावट ओळखपत्र बाळगल्याचे दिसताच त्यांना पकडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक महापालिकेचे बनावट ओळखपत्र पकडण्यात आले. सुमारे 80 टक्के बनावट ओळखपत्र बृन्हमुंबई महापालिकेचे पकडण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
(संपादन- विराज भागवत)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.