थैमान ! मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 15 हजाराच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजची रुग्णसंख्या

corona
corona
Updated on

मुंबई : मुंबईत आज नव्या 426 रुगणांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा 15 हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या 14,781 वर पोहोचली आहे. आज 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 556 वर पोहोचला आहे. आज मुंबईतील विविध परिसरात 426 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 14,781 झाली आहे.

आज झालेल्या 28 मृत्यूंपैकी 17 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 17 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी चौघांचे वय 40 च्या खाली होते. 10 रुग्णांचे वय 60 वर्षांच्यावर होते. तर उर्वरित 14 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 613 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 16,206 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 203 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 3,313 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नवे औषध
पालिका रुग्णालयातील कोरोना आजाराने बाधित असलेल्या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणूंची तीव्र बाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'इंजेक्शन टोसीलुझुमॅब' या नवीन औषधांचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 40 रुग्णांना हे औषध देण्यात आले आहे. यांपैकी 30 रुग्णांमध्ये या औषधामुळे चांगले परिणाम आढळून आले आहेत. तर 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

number of patients in Mumbai is close to 15 thousand, 426 new patient

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.