मंत्रालयात नोकरी करणाऱ्या कल्याणच्या तीन जणांना ओमिक्रॉनची बाधा

Omicron
Omicronsakal media
Updated on

डोंबिवली : कल्याण (kalyan) परिसरात राहणारे व मंत्रालय (Mantralaya) येथे नोकरी करणारे 3 जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे कर्मचारी लक्षण विरहित असून त्यांना पालिकेच्या आर्ट गॅलरीत (Admitted in bmc art gallery) उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील (dr ashwini patil) यांनी दिली. यामध्ये 2 पोलीस व एक लिपिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. (omicron three patients found in Kalyan who works in mantralaya Mumbai)

Omicron
मुंबईत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात ३६७१ नव्या रुग्णांची भर

कल्याणमध्ये राहणारे साधारण 30 ते 40 वयोगटातील तीन व्यक्तींचा ओमिक्रॉन अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आला. मुंबई येथे मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठ दिवसाला जे. जे. हॉस्पिटल यांच्या पथकाकडून आरटीपीसीआर चाचणी केली जाते. ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे संक्रमण वाढत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. या चाचणी दरम्यान या तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

अहवाल येताच यातील एक व्यक्ती ही 20 डिसेंबरला पालिकेच्या कल्याण आर्ट गॅलरी कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाली. तर दोघे घरीच गृह विलगिकरणात होते. बुधवारी या तिघांचा ओमिक्रॉन अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्यत्यांना देखील आर्ट गॅलरी येथे हलविण्यात आले. हे तीनही रुग्ण लक्षणविरहित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी दिली.

Omicron
मुंबईत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात ३६७१ नव्या रुग्णांची भर

कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझेशन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, गर्दी टाळणे आवश्यक आहे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. राज्यातील पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला होता. केपटाऊन येथुन 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत आलेल्या 33 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाली होती.

लक्षात आल्यानंतर त्याला 27 नोव्हेंबरला पालिकेच्या आर्ट गॅलरीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. 4 डिसेंबरला त्याचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला. 8 डिसेंबरला त्याची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. परदेशातून आलेला हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येताच आरोग्य विभाग सतर्क झाले. शहरात परदेशातून आलेल्या नागरीकांचा शोध घेत त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात येत होती.

या तपासणीमध्ये नायझेरियातून आलेले 4 जणांचे कुटुंब 3 डिसेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले होते. 17 डिसेंबरला त्यातील 45 वर्षीय व्यक्तीचा अहवाल हा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला होता. मात्र हा रुग्ण देखील लक्षणविरहीत होता, तसेच त्याची त्याच दिवशी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.