मुंबई : कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या (Omicron new variant) पार्श्वभूमीवर मुंबई शहराला पालिकेने 15 जानेवारीपर्यंत हाय अलर्टवर (Mumbai on high alert) ठेवले आहे. पालिका परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे लक्ष ठेवून आहे. दर 15 - 15 दिवसांनी लक्ष ठेवले जात आहे, 31 डिसेंबरपर्यंत बरेचसे नागरिक परदेशातून मुंबईत दाखल होतील. त्यातील एखादा प्रवासी ओमिक्रॉन पाॅझिटिव्ह (omicron positive patients) असेल तर त्याला आजार होण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो. असा विचार केला तर शेवटचा नागरिक 30 किंवा 31 तारखेला आला आणि त्याला संसर्ग असेल तर किमान 15 दिवसांचा कालावधी त्याला बरे होण्यास लागतील. त्यामुळे, पालिकेला 15 जानेवारीपर्यंत मुंबईत लक्ष ठेवावे लागेल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh kakani) यांनी सांगितले.
शहरातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढीदरम्यान, पालिकेने सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत आपापल्या प्रभागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत 12 ओमिक्रॉन रुग्ण आढळले असून त्यापैकी बहुतेक लक्षणे नसलेले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढेल आणि या गर्दीवर परिणामी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
राज्य टास्क फोर्सने सरकारला येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी, कोविड 19 चे नियम जसे एन 95 किंवा दुहेरी मास्क घालण्यावर भर देऊन कोविड-योग्य वर्तनाला बळकटी द्यावी, लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे आणि राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांची तयारी तपासावी असा सल्ला दिला आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, पालिका उच्च जोखीम असलेल्या देशांतील सर्व प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येकाला आरटी-पीसीआर चाचण्या करणे आवश्यक आहे. ते म्हणाले, की दिवाळीनंतर केसेस वाढण्याची भीती होती त्यात किरकोळ वाढ झाली. पण, आता ओमायक्रॉन व्हेरियंट हा 'चिंतेचा प्रकार' आहे म्हणून आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये स्क्रीनिंग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि जे परदेशी प्रवासी चुकले आहेत त्यांना तपासण्याचे काम हाती घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.