New Year : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण...

सुरक्षेसाठी 11500 पोलिसांची तैनाती
On the eve of new year Mumbai Police is ready 11500 policemen deployed for security mumbai
On the eve of new year Mumbai Police is ready 11500 policemen deployed for security mumbaisakal
Updated on

मुंबई : कोरोना प्रतिबंधानंतर दोन वर्षांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत. मुंबईतील प्रमुख ठिकाणी मुंबईकर जनता मोठ्या प्रमाणात जमणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीसांकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख ठिकाणी 11500 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, उपनगरी वांद्रे, बँडस्टँड आणि इतर प्रमुख ठिकाणांजवळ मोठी गर्दी जमू शकते.

या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत.

राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पोलीस आणि क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) यांच्यासह 11500 हून अधिक पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जातील. या मध्ये 10000 पोलीस हवालदार, 1500 अधिकारी, 25 पोलीस उपायुक्त आणि सात अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरक्षा तैनातीचा भाग असतील.

याशिवाय, 46 एसआरपीएफ प्लाटून, तीन दंगल नियंत्रण पोलिस तुकड्या आणि 15 क्यूआरटी तुकड्या देखील तैनात केले जातील. सुरळीत वाहतुक व्यवस्थापनासाठी 31 डिसेंबर रोजी अतिरिक्त वाहतूक पोलिसही ड्युटीवर असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.