Kalyan News: महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी या उद्देशाने महिला दिन साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. राजकारणापासून ते विज्ञान, कला, संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो.
महिला दिनानिमित्त असाच एक कार्यक्रम कल्याणमध्ये पार पडला. The Millennium Welfare Foundation या सामाजिक संस्थेने मेट्रो प्लाझा येथे कार्यरत असलेल्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
The millennium welfare Foundation ही संस्था 2001पासून महिलांसाठी काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून वृद्धांना आधार देणे, महिला सक्षमीकरण, समाजातील तळागाळातील मुला मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन दिले जाते. समाजात जागरूकता निर्माण करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.
हेच ध्यानी घेऊन या संस्थेच्या शहर प्रमुख जोया शेख, कार्यकारी प्रमुख विनोद राठोड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते निखिल देठे व नम्रता कदम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रस्तुत कार्यक्रम मेट्रो प्लाझाच्या हाउसकीपिंग मॅनेजर राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. The Millennium Welfare foundationच्या या कार्यक्रमाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका थीमसह साजरा केला जातो. 2024 मध्ये, हा दिवस Inspire Inclusion (एक असे जग जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळतो) या थीमसह साजरा केला गेला.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की महिलांना पुरुषांइतकाच सन्मान मिळावा आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी. महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजातील असमानता दूर करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.