पुन्हा पुन्हा तेच घडतंय, कायदे केलेत तरीही तेच... हे थांबणार की नाही ?

पुन्हा पुन्हा तेच घडतंय, कायदे केलेत तरीही तेच... हे थांबणार की नाही ?
Updated on

मुंबई - पालिकेच्या कूपर रूग्णालयात विलगीकरण कक्षातून नातेवाईकांना बाहेर जाण्याचा सल्ला देणे डॉक्टरांना महाग पडले असुन निवासी डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखता यावे यासाठी सरकारने कायदा लागू केला आहे. मात्र, रूग्णालयात पुरेशी व्यवस्था नसल्याने हे हल्ले थांबत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

नेमके काय घडले? 

सहाव्या मजल्यावर असणार्या विलगीकरण कक्षात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णाला भेटण्याची मागणी त्यांच्या 2 मुली करत होत्या. विलगीकरण कक्षात आल्यानंतर त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरूवात केली. त्यामुळे, तिथे उपस्थित असलेल्या औषधशास्त्र विभागातील निवासी डॉक्टरांनी त्यांना वॉर्डच्या बाहेर जाण्यास आणि रेकॉर्डींग थांबवायला सांगितले. याच रागातुन या दोन्ही मुली आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केला.

या मुलींनी डॉक्टरच्या हाताचा चावा घेतला असून मान, हातावर नखे ओरबडल्याची तक्रार केली आहेदरम्यान, जेव्हा हे सर्व प्रकरण घडलं तेव्हा वॉर्डच्या बाहेर एक वृद्ध महिला सुरक्षा रक्षक म्हणून तैनात केली होती. या महिलेला धुडकावत नातेवाईक थेट वॉर्डमध्ये शिरले. खरंतर, कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि रुग्णाच्या, नातेवाईकाच्या सुरक्षेसाठी विलगीकरण कक्षात जाण्यास मनाई आहे. तरीही, नातेवाईक जबरदस्तीने कक्षात येत असल्याची तक्रार डॉक्टर्स करतात. 

विलगीकरण कक्षात आतापर्यंत नातेवाईकांनी आक्रमक होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. डॉक्टरांवर अनेक हल्ल्यांच्या घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचा आरोप ही डॉक्टरांनी केला आहे. 
या आधीही परिचारिकेला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. 

याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता नातेवाईकांनी माफिनामा दिला. त्यामूळे हे प्रकरण तिथेच मिटले. आजपासून सर्व डॉक्टर्स कामावर आले असुन परिस्थिती पुर्वपदावर आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या संपुर्ण प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाकडून दखल घेतली गेली आहे. विलगीकरण कक्षापासून नातेवाईकांना दुर कसं ठेवता येईल यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. त्यामूळे असे वाद निर्माण होणार नाहीत. - डॉ. पिनाकीन गुज्जर, अधिष्ठाता, कूपर रूग्णालय. 

once again resident doctor is on target of relatives of patient read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.