Mahad News : गुगल मॅपमुळे दिशाभूल; दीडशे किलोमीटरचा फेरा...

महाड आणि महड या दोन गावांतील नावाच्या गोंधळामुळे गुगल मॅपमुळे पर्यटकांची दिशाभूल
Google Map
Google Mapsakal
Updated on

महाड - गुगल मॅपचा आधार घेत प्रवास करणे सध्या सोयीचे झाले असले, तरी अनेकांना त्यामुळे भरकटावे लागल्याची उदाहरणेही आहेत. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक व गणेशभक्तांनाही या मॅपचा फटका बसत आहे.

महाड आणि महड या दोन गावांतील नावाच्या गोंधळामुळे गुगल मॅपमुळे पर्यटकांची दिशाभूल होत आहे. पर्यटक व गणेशभक्तांना शंभर ते दीडशे किलोमीटर अंतराचा फेरा पडत आहे.

सध्या श्रावण महिना सुरू असून, अनेक जण देवदर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देत असताना वाहनचालक गुगल मॅपचा वापर करतात. महड व पाली या दोन ठिकाणी अष्टविनायकांची स्थाने आहेत.

Google Map
Kokan Rain Update : गुहागरला झोडपले; पत्रे पडून आईसह दोन मुले जखमी

यामुळे दर्शनासाठी गणेशभक्त शनिवार, रविवार, संकष्ट चतुर्थी आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर पडतात. पुणे नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागांतूनही गणेशभक्त येत असतात. मोठ्या खासगी बस अथवा लहान कारने प्रवास करणारे गुगल मॅपचा वापर करत महड येथील अष्टविनायक दर्शनासाठी निघतात. यावेळी गुगल मॅपमध्ये महड टाकले जाते.

मात्र, जिल्ह्यामधील महड व महाड या दोन्ही ठिकाणांचे इंग्रजीमध्ये शब्द mahad असे होते. कित्येक जणांना हे दोन्ही ठिकाण एकच असल्याचे वाटते. याचाच आधार घेत प्रवासी व पर्यटक महाडला पोहोचतात. तेथे चौकशी केल्यानंतर आपण रस्ता चुकल्याचे समजते.

Google Map
Raj Thackeray यांच्या नेतृत्वात Mumbai Goa Highway वर कोकण जागर यात्रा, MNS काय साधणार?

अष्टविनायक दर्शनामध्ये पालीच्या गणपतीचे दर्शन महड गणेशानंतर करायचे असते. त्यामुळे रस्ता चुकल्यानंतरही गणेशभक्तांना महाड-पालीमार्गे महड आणि तेथे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा पाली येथे शेवटच्या दर्शनासाठी यावे लागते.

असा सुमारे दीडशे किलोमीटरचा ज्यादा अंतराचा फटका भक्तांना बसतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ व इंधन वाया जात आहे. गुगल मॅपमध्ये योग्य ती सुधारणा केली जावी, अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.

Google Map
Raigad: धोकादायक छताखाली धडे हाळखुर्दच्या उर्दू शाळेची दुरवस्‍था; पालक आक्रमक

महाड येथून पालीमार्गे महड असा प्रवास

गुगल मॅपवर महड गणेश मंदिर टाकले, तरी महाड येथील एखाद्या गणेश मंदिराचा रस्ता दाखवला जातो. बहुसंख्य वेळेस चवदार तळे व काकर तळे या ठिकाणी असलेले गणेश मंदिर गुगल मॅपमध्ये दिसते. त्यामुळे अनेक जणांची प्रवास करताना दिशाभूल होते

दररोज अनेक वाहने या ठिकाणी रस्त्याची चौकशी करतात. दूर अंतरावरून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना पुन्हा महाड येथून पालीमार्गे महड असा सुमारे १०० ते दीडशे किलोमीटरचा जादा प्रवास करावा लागतो.

गुगल मॅपमध्ये योग्य ती सुधारणा केली जावी. सारख्या नावाची अथवा स्पेलिंगची अनेक नावे आहेत. त्यामुळे गुगलने आपले मॅप अपडेट करावेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

- विघ्नेश पाठक, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()