विधानसभेच्या निवडणुकांसाठीचा राज्यात प्रचार थंडावला असून आता मतदानाची तयारी सुरू झाली आहे. मुंबईत विधानसभेेचे ३६ मतदारसंघ आहेत. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मुंबईतील ८५ वर्षांवरील सहा हजार २७२ ज्येष्ठ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान केंद्रांवर जवळपास ४६ हजार ८१६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून बंदोबस्तासाठी २५ हजार ६९६ पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जवळपास एक कोटींपेक्षा जास्त मतदार मुंबईत आहेत.