मानखुर्द : गोवंडीच्या शिवाजी नगर पोलिसांनी (Shivaji nagar police) तब्बल १०८ किलो गांज्यासह (ganja seized) दोन आरोपींना बेड्या (two culprit arrested) ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुर्गन मूपनार व दिनेश चव्हाण या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजाच्या साठ्यासह तीन वाहनेदेखील जप्त (three vehicle seized) केली आहेत.
शिवाजी नगर परिसरातून उपनिरीक्षक दत्तात्रय बनसोडे यांच्या पथकाने ६०० ग्राम गांजासह मुर्गन मूपनार याला मंगळवारी (ता. ८) अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. खबऱ्यांनी तो ठाणे जिल्ह्यातील उपवन परिसरात असल्याची माहिती दिली.
त्यानुसार दिनेश चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील टेम्पोमध्ये सुमारे ६५ किलो गांजा सापडला. तसेच एका चारचाकी वाहनात व रिक्षामधून गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केला. असा एकूण २८ लाख रुपयांचा १०८ किलो गांजा, टेम्पो, चारचाकी वाहन व ऑटो रिक्षा असा एकूण साडे ३९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.