मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत; एसटी कामगार सेनेची कुटुंबियांना भावनिक साद

मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत; एसटी कामगार सेनेची कुटुंबियांना भावनिक साद
Updated on

मुंबई  : गेल्या तीन महिन्यातील वेतन आणि आर्थिक संकटाला कंटाळून जळगाव आणि रत्नागिरी डेपोच्या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांची होरपळ होऊ नये यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने पुढाकार घेऊन, मृतक एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

एसटी महामंडळातील जळगाव येथील एसटी वाहक मृतक मनोज चौधरी आणि रत्नागिरी डेपोचे वाहक पांडुरंग गडदे यांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांवर सुद्धा आर्थिक संकट ओढावले होते. अशा अडचणीच्या काळात कुटुंबियांच्या पाठीशी राहण्यासाठी एसटी कामगार सेनेकडून कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. 

एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या आदेशान्वये आर्थिक मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान एसटी कामगार सेनेच्या विभागीय पदाधिकार्‍यांनी मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केली. तसेच याप्रसंगी शोकसभेत आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करून, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे.

One lakh each to the families of deceased ST employees Emotional appeal to the families of ST Kamgar Sena

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.