अकरावीचे एक लाख विद्यार्थी प्रवेशाविना! तिसऱ्या गुणवत्ता यादीतील केवळ 14 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

अकरावीचे एक लाख विद्यार्थी प्रवेशाविना! तिसऱ्या गुणवत्ता यादीतील केवळ 14 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या फेऱ्यांनंतरही अद्याप सुमारे एक लाख दोन हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. तर एक लाख 84 हजार 960 जागा रिक्त आहेत. 

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा पाहावयास मिळते. मात्र यंदा नामांकित महाविद्यालयातील अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत. तिसऱ्या फेरीत 45 हजार 402 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. यापैकी केवळ 14 हजार 69 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीत प्रवेश मिळालेल्या सुमारे 31 हजार 333 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला आहे. तिसऱ्या फेरीनंतर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक लाख 2 हजार विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीसाठी इन हाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील सुमारे 36 हजार 574 जागा आणि ऑनलाइन प्रक्रियेतील सुमारे एक लाख 48 हजार 386 अशा मिळून एक लाख 84 हजार 960 जागा रिक्त आहेत.

या विशेष फेरीत बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. या फेरीसाठी आतापर्यंत विविध कोट्यातील 46 हजार 55 जागा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशाची पुन्हा संधी मिळू शकणार आहे. तिसऱ्या यादीनंतरही 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली होती. मात्र आता या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची आशा वाढली आहे.

One lakh students without admission Admission of only 14 thousand students in the third merit list

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.