Akshay shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर खरा की खोटा? अलाहबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश शोधणार सत्य

Badlapur Case: या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते.
Image of Akshay Shinde, accused in Badlapur sexual assault case, whose encounter has raised questions.
Akshay Shinde Encounter Badlapur Case Esakal
Updated on

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलीस चकमकीत ठार करण्याच्या घटनेचे ठाणे पोलिसांच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने नुकतेच या चकमकीच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे.

या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती भोसले हे मे २०२४ मध्ये घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीच्या समितीचेही नेतृत्व करत आहेत, ज्यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा एक सदस्सीय आयोग 23 सप्टेंबरची चकमक खरी होती की खोटी यासाठी याच्याशी संबंधीत प्रत्येकाचा तपास करणार आहे.

याचबरोबर घटना घडली त्यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली याचाही तपास हा आयोग करणार आहे.

विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आणि चकमकीदरम्यान घडलेल्या घटनांच्या पोलिसांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

शारीरिकदृष्ट्या दुर्बल शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावले, ते उघडले आणि गोळीबार केला, या ठाणे पोलिसांच्या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात गंभीर शंका उपस्थित केली होती.

या चकमकीचा तपास निःपक्षपाती आणि सखोल व्हायला हवा, यावर न्यायालयाने भर दिला होता. शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या चकमकीच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.

Image of Akshay Shinde, accused in Badlapur sexual assault case, whose encounter has raised questions.
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तरुणाने केला पेटवून घेण्याचा प्रयत्न; वर्षा बंगल्याच्या परिसरात नेमकं काय घडलं?

23 सप्टेंबर रोजी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी पोलीस जीपमधून बदलापूरला नेत होते. तेव्हा वाटेत मुंब्रा बायपासजवळ आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. असे पोलिसांनी सांगितले होते.

पण पोलिसांच्या या माहितीवर विरोधी पक्षांसह आरोपीच्या कुटुंबीयांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

Image of Akshay Shinde, accused in Badlapur sexual assault case, whose encounter has raised questions.
Govinda Misfire: अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी, मिसफायरवर शंका... नेमके काय घडले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.