परदेशी नागरिकाच्या पोटात दीड कोटी रुपयांचे घबाड

File Photo
File Photo
Updated on

मुंबई : अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून 23 वर्षांच्या ब्राझिलियन नागरिकाला हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) ताब्यात घेतले. डॉक्‍टरांनी त्याच्या पोटातून कोकेन भरलेल्या 53 कॅप्सूल बाहेर काढल्या. या अमली पदार्थाची किंमत दीड कोटी रुपयांहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जोस हेन्रिक डिसिल्वा डॉमिंग्यूस (23) हा ब्राझीलचा नागरिक 14 मार्चला इथिओपिअन एअरलाईन्सने मुंबईत आला. एआययूने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय असल्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली.

त्यानुसार जे. जे. रुग्णालयात त्याची क्ष-किरण तपासणी व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्याच्या पोटातून कोकेन भरलेल्या 53 कॅप्सूल काढल्या. जप्त करण्यात आलेल्या 534 ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी 60 लाख रुपये आहे.

ब्राझीलमधील साओ पावलो येथील एका व्यक्तीने त्याला हे कोकेन दिले आणि मुंबईत पोहोचण्यासाठी 1000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 70 हजार रुपये) देण्याचे मान्य केले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर डॉमिंग्यूस पर्यटन व्हिसावर भारतात आला. त्याचा प्रवासखर्च कोकेन देणाऱ्यानेच केला होता; त्याची ओळख पटली आहे.

One million rupees of cocaine in the stomach of a foreigner 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.