मुंबई: मुंबईत बोगस लसीकरण झाल्याची दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. परळच्या पोद्दार सेंटर (parel areal podar center) मध्ये आता सहा जणांच्या टोळीने बोगस लसीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोगस लसीकरणाबाबत भोईवाडा पोलिस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईत बोगस वँक्सिनेशन (fake vaccination) केल्या प्रकरणी कांदिवली, (kandivali) वर्सोवा, खार आणि बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचा नोंद असून या चारही ठिकाणी एकाच टोळीने हे कृत्य केले होते. (one more fak vaccination in mumbai parel areal podar center)
मात्र या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात महेंद्र सिंग, श्रीकांत माने, सिमा सिंग व इतर तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. या तिघांनी 28 मे ते 29 मे या दरम्यान डाँक्टर असल्याचे भासवून परळच्या पोद्दार सेंटर मध्ये लसीकरण कँम्पचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पोद्दार सेंटरच्या 207 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले.
या लसीकरणानंतर आरोपींनी नानावटी व लाईफ लाईन केअर हाँस्पिटलच्या नावाने बोगस प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 44 हजार 800 रुपये उकळले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. बोगल लसीकरण प्रकरणात मुंबई पोलिसांनी गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ही महिला नेस्को कोविड सेंटर मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असून ही या प्रकरणात झालेली सहावी अटक आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली असून गुडिया यादव असे या आरोपीचे नाव आहे.
कोर्टाने काय म्हटलं?
मुंबई उच्च न्यायालयाने कांदिवलीतील या बोगस लसीकरणाची दखल घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना गुरुवारपर्यंत या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कांदिवली सारखे बोगस प्रकार घडू नये, यासाठी राज्य सरकारने लसीकरणा संदर्भात काटेकोर प्रक्रिया राबवावी असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कल्पनाही करु शकत नाही, अशा संकट काळात सर्वचजण त्रासलेले असताना लोक अशा प्रकारचे घोटाळे करत आहेत" अशा शब्दात कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. लसी ऐवजी पाणी टोचलं असेल, त्यातून काही दुष्परिणाम झाले तर, जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.