नालासोपारा : पालघरमधील गडचिंचलेमधील हल्ला प्रकरण शमत नाही तोच आता वसईतील निर्मळ गावात सोमवारी (ता.5) रात्री साडे आठच्या सुमारास एकाच गावातील 60 ते 70 जणांनी परप्रांतीय कुटुंबाच्या घरावर दगड, वीट, लोंखडी सळईच्या सहाय्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना इच्छितस्थळी जाण्यासाठी कुटुंबातील एक जण मदत करत होता. मजूरांचा फॉर्म पहिला भरण्यावरुन झालेल्या वादातून झालेल्या हल्ल्यात महिला आणि मुलगा जखमी झाला आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, निर्मळ गावात आनंदराम चौहान यांचा बंगला आहे. आनंदराम याचा मुलगा ब्रिजेश हा सामाजिक कार्यकर्ता आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे विनामुल्य काम तो करत आहे. हे फॉर्म भरण्यावरून बाजूच्या कळंब गावातील एकासोबत वादविवाद झाला. याच वादातून काल राञी कळंब गावाच्या 60 ते 70 जणांनी दगड, विटा, लोखंडी सळईने बंगल्यावर हल्ला करून, बंगल्याच्या काचा, घरातील सामानाची नासधूस केली, असे ब्रिजेश याची पत्नी रिमा, त्यांचे शेजारी विजेता सूर्वे यांनी सांगितले.
हल्लानंतर रात्री उशिरा वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी ब्रिजेश चौहान याने उत्तरभारतीय मजुरांना ऑनलाइन फॉर्म भरून देताना झालेल्या वादातून हल्ला झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याचा तपास सुरू आहे, असे वसई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.
one more indecent like palghar happened in nalasopara read full report
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.