शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

sharad-pawar.jpg
sharad-pawar.jpg
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर येत्या 8 ते 10 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवार यांच्यावर काल रात्री उशीरा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवार यांना पित्ताशय नलिकेत खडे आढळल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत होता.

मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला असल्याचे टोपे म्हणाले. 

लवकरच आणखी शस्त्रक्रिया - 
टोपे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकरच पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला.  लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.