Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा एकजण अल्पवयीन? आरोपीने कोर्टासमोर दिली माहिती

Baba Siddique shot dead : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
NCP Leader Baba Siddique Shot Dead
NCP Leader Baba Siddique Shot Dead
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकारानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. दरम्यान सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे हरियाना आणि उत्तर प्रदेश येथील असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान आता या आरोपींविषयी नवीन खुलासे होते आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झडणारा एक आरोपी अल्पवयीन असून त्याचे वय अवघे १७ वर्षे इतके आहे. पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपी धर्मराज काश्यप याने न्यायालयाला आपलं वय १७ असल्याची माहिती दिली आहे. न्यायालयाने खातरजमा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या आधिकऱ्यांना याबाबतचे पुरावे, आधार कार्ड वगैरे सादर करण्यास सांगितले आहे.

यासोबतच अटक केलेला आरोपी आणि त्यांचे दोन साथीदार मुंबईसोबत पुण्यात देखील वास्तव्यास होते. दरम्यान फरार आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेची १० पथके तयार करून राज्यात, राज्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

महत्वाची बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे २८ जिवंत काडतुसे मिळाली आहेत, त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी लक्ष्य होते का? याचा तपास देखील गुन्हे शाखा करत आहे.

सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या आरोपींची ओळख पटली असून एकाचे नाव गुरमैल बलजीत सिंह असून तो हरियाणाचा रहिवाशी आहे. तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील असून त्याचे नाव धर्मराज राजेश कश्यप असे आहे त्याचे वय १९ आहे. तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचे नाव शिव कुमार गौतम उर्फ शिवाअसून तोही बहाराइच येथील राहणारा आहे.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Bishnoi Gang-Baba Siddique: "सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो..." बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी अखेर बिश्नोई टोळीने स्वीकारली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.