उरणमध्ये हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प, ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

उरणमध्ये हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प, ऊर्जामंत्र्यांचे निर्देश
Updated on

मुंबई:  वीज पुरवठा ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी उरण येथेच विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर नवा किमान एक हजार मेगावॅट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या 2 वर्षात उभे करण्याच्या सूचना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

राऊत यांनी गुरुवारी उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. या वेळेस त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली. मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2500 मेगावॅट असते आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगावॅट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला झालेली वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगावॅट वीज निर्मिती होते. 

12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने आणि मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान 1 हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा पक्रल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असे डॉ राऊत यांनी सांगितले.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

One thousand megawatt capacity project in Uran Energy Minister Nitin Raut Directed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.