वाशी : १००० क्विंटल कलिंगडांची आवक; बाजारात गारेगार कलिंगड दाखल

Watermelon fruit
Watermelon fruitsakal media
Updated on

वाशी : उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी बाजारात गारेगार कलिंगडे (watermelon fruits in vashi market) दाखल झाली आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कलिंगडाची विक्री २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने केली जात आहे. कलिंगडांच्या हंगामाची सुरुवात जानेवारी महिन्यात होते. जून महिन्यापर्यंत हा हंगाम सुरू असतो. अवकाळी पावसामुळे (untimely rain) यंदा कलिंगडांचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला. पुढील आठवड्यात कलिंगडांची आवक आणखी वाढेल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (Mumbai Krushi Utpanna Bajar Samiti) मध्ये सध्या १००० क्विंटल कलिंगडांची आवक होत आहे. हे कलिंगड सांगली, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट येथून येत असून उन्हाळ्‌यात मागणी वाढत असल्‍याची माहिती कलिंगडाचे व्यापारी भरत मोरे यांनी दिली.

Watermelon fruit
नवी मुंबई : बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई; आरोपी गजाआड

गडद हिरव्या रंगाची कलिंगड 'शुगर किंग' या नावाने ओळखली जातात. नावाप्रमाणेच त्यांची चवही साखरेसारखी मधूर असते. फिक्कट हिरवे पट्टे असणारी लांबट आणि आकाराने मोठी असणारी कलिंगड 'नामधारी' या नावाने ओळखले जातात. फ्रूट सलाड आणि ज्यूस बनवण्यासाठी ही कलिंगड मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

शुगरक्वीनला सर्वाधिक मागणी

शुगरक्वीन जातीच्या कलिंगडांना सर्वाधिक मागणी असते. बाहेरून काळेभोर आणि गर लाल असणारी शुगरक्वीन कलिंगडे ग्राहकांच्या पसंतीत उतरतात. शुगरक्वीन कलिंगडे चवीला चांगली असतात. उन्हाची काहिली वाढल्यानंतर कलिंगडांच्या मागणीत आणखी वाढ होईल. ज्यूस सेंटरचालकांकडून उन्हाळ्यात कलिंगडांना मोठी मागणी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.