एका अनोख्या गावाची कहाणी ! इथे मित्राला नावानी हाक मारली तर भरावा लागतो दंड

एका अनोख्या गावाची कहाणी ! इथे मित्राला नावानी हाक मारली तर भरावा लागतो दंड
Updated on

"तेरी मेरी यारी, मग खड्ड्यात गेली दुनियादारी" असं नेहमी बोललं जातं. आपली व्हेवलेंथ ज्यांच्याशी जुळते किंव्हा ज्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळतात त्यांच्याशी आपली मैत्री होते. कधी ही मैत्री काही क्षणाची असते, कधी काही दिवस किंवा महिने किंवा काहीवेळेस आपली मैत्री वर्षानुवर्षे घट्ट टिकून राहते. अनेकदा आपल्या रक्ताच्या नात्यांपेक्षा आपले मित्रच आपल्या कठीण वेळी साथ देतात. मैत्रीसाठी काहीपण म्हणत अनेकांनी मित्रासाठी खरोखर काहीपण केलंय. मैत्री काही मुद्दामून करायची गोस्ट नाही असं आपण म्हणतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका गावात नेणार आहोत जिथे अरेंज मॅरेज सारखी अरेंज मैत्री होते. 

छत्तीसगडमधल्या राजनांदगाव जिल्ह्यात एक अनोखं मरकाकसा नावाचं अनोखं गाव आहे. इथे अरेंज मैत्रीची पद्धत आहे. होय, हे खरंय. अरेंज मॅरेजसाठी ज्याप्रकारे वधू वर मेळावे होतात. सगळेजण एकत्र जमतात. आपले विचार मांडतात अगदी तसंच या गावातही होतं. देवाच्या साक्षीने इथे मैत्री सोहळा होतो. हे सारं अरेंज मैत्रीसाठी. या गावाची खासियत म्हणजे इथे मैत्री संस्कारांप्रमाणे जोपासली जाते. 

गाव तसं लहानसंच. या गावात १९० घरं. या गावात जी मैत्रीची विशेष परंपरा आहे ती या गावाच्या आसपासच्या गावांमध्येही आहे. या गावात मित्राला 'मितान' असं म्हणतात. बरं या गावात मैत्रीचे काही नियमही आहेत. इथं तुम्ही आपल्या मित्राला त्याच्या नावावरून हाक मारू शकत नाहीत. तसं केलं तर तुम्हाला पंचायतीत दंड भरावा लागतो. या गावात मित्राला फूल-फुलवारी किंवा गंगाजल किंवा महाप्रसाद अशा नावाने संबोधलं जातं. अगदीच गरज पडल्यास मित्राचं नाव कागदावर लिहून तुम्ही त्या व्यक्तीला बोलावू शकतात. पण हाक मारायला नो परमिशन. 
 
गावात मैत्रीसाठी असणाऱ्या काही प्रथा परंपरा : 

जसं आपल्याकडे अजूनही आपले आई बाबा किंवा घरातील महत्त्वाच्या व्यक्ती आपल्यासाठी वधू किंवा वर निश्चित करतात तसं इथे घरातले जेष्ट आपल्यासाठी मित्र निवडतात. इथे मुलाला मुळाशी आणि मुलीला मुलीशी मैत्री  करायची  परवानगी आहे. बरं महत्त्वाची बाब म्हणजे या गावात नातलग आपल्या नातलगांशी मैत्री करू शकत नाहीत. या अरेंज फ्रेंडशिपमध्ये बहुतांश लोकं आपल्या गावाबाहेरील फूल- फुलवारी बनवतात आणि त्यांची जात किंवा धर्म हे देखील वेगळं असेल हे पाहिलं जातं. हा मैत्रीचा सोहळा गौरी आणि गणपतीच्या साक्षीने म्हणजेच देवतांच्या फोटोसमोर पैशांची देवाण घेवाण करत, एकमेकांना हळद कुंकू लावून संपन्न होतो. त्यानंतर मित्राला पान खाऊ घातलं जातं. मित्राच्या वडिलांना फूल बाबू, आईला फूल दाई म्हटले जाते.

one unique village where if you take your friends name you have to pay fine

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.