तुर्भे ः परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे घाऊक बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. आज घाऊक बाजारात कांदा तब्बल 85 रुपये किलोवर गेला होता; तर सोमवारी (ता. 19) 60 ते 70 रुपये किलोने घाऊक बाजारात विक्री होणाऱ्या कांद्यात तब्बल 15 रुपयांनी वाढ झाली. दरम्यान किरोकळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा तब्बल 100 ते 110 रुपये किलोने विकला जातो आहे. तर पावसात भिजलेला कांदा किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपयांनी विकला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आज वाशीतील एपीएमसी बाजारात आज 76 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. अतिवृष्टीने गणेशोत्सवापासून कांद्याचे दर वधारले होते. एपीएमसी बाजारात शेतमालाची आवक घटली होतीच, परंतु दाखल होणारा कांदादेखील मोठ्या प्रमाणात खराब निघत होता. त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव वधारले होते. आता पुन्हा पावसाची संततधार येत असल्याने उत्पादनाला फटका बसला असून बाजारात आवक कमी होते आहे. मागील आठवड्यात कांद्याच्या दरात चढ-उतार पाहावयास मिळत होते. मागील आठवड्यात 40-50 रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा आज घाऊक बाजारात 85 रुपयांवर पोहचला . पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर गेले आहे. बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास विलंब होणार असून डिसेंबरपर्यंत दरात तेजी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
600 टन परदेशी कांदा आयात
एपीएमसी बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा कमी पुरवठा होता असल्याने कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने त्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी इराण आणि इजिप्तवरून कांद्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई बंदरात 600 टन परदेशी कांदा आयात केला असून वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमावारी 25 टन इराणचा कांदा दाखल झाला आहे. बाजारात इराणचा कांदा 50-60 रुपये; तर नवीन कांदादेखील 50-65 रुपयांनी विक्री झाला; तर जुना कांदा 85 रुपयांवर पोचला आहे.
onion 100 rs kg in apmc navi mumbai
( संपादन ः रोशन मोरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.