फेसबुकवर जाहिरात पाहून मागवला भारी ड्रेस, घरी आल्या जुन्या वापरलेल्या साड्या

फेसबुकवर जाहिरात पाहून मागवला भारी ड्रेस, घरी आल्या जुन्या वापरलेल्या साड्या
Updated on

मुंबई : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीये. अशात अनेकांचा कल हा नवीन गोष्टी किंवा कपडे खरेदी करण्यावर आहे. अशातच दिवाळी आणि नागरिकांचा कल पाहता काही भामटे आपला गोरखधंदा तेजीत सुरु करताना पाहायला मिळतायत. सध्या जमाना डिजिटलचा आहे. अशात कोरोनाची भीती असल्याने अनेक जण ऑनलाईन शॉपिंगला पसंती देतायत. मात्र मधल्यामध्ये ऑनलाईन फ्रॉड करून करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरु झालेत. त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन खरेदी करत असाल तर ही बातमी  नीट वाचा आणि आपल्या जवळच्यांना शेअर देखील करा. 

घटना घडलीये वसईमध्ये. वसईमधील एका महिलेची ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून मोठी फसवणूक केली गेलीये. या महिलेने एका फेसबुक पेजवरून तब्बल साडे पाच हजारांचा ड्रेड मागवला होता. मात्र या महिलेला वापरलेल्या साड्या पाठवण्यात आल्या आहेत. डिलेव्हरी डॉट कॉम असं या साईटचे नाव आहे. त्यांची जाहीतारत सदर महिलेने फेसबुकवर पहिली होती. त्यामध्ये साडे पाच हजारांचा ड्रेस तेराशे रुपयांना अशी ऑफर देखील देण्यात आली होती.

याच ऑफरला भुलल्याने या महिलेने पैसे भरून ड्रेस मागावला देखील. मात्र जेंव्हा त्या महिलेकडे तिचं पार्सल पोहोचलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या ड्रेसच्या बदल्यात या महिलेला वापरलेल्या घाणेरड्या साड्या पाठवण्यात आल्यात. सुरवातीला या महिलेला आलेलं पार्सल चुकून आलं असेल असं वाटलं, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ऑर्डर केली. मात्र दुसऱ्या ऑर्डरवेळी देखील तेच घडलं आणि पुन्हा तशाच वापरलेल्या साड्या आल्याने सदर महिलेला पुन्हा धक्का लागला. 

याप्रकरणी सदर महिलेने पोलिस स्थानकात तक्रार केलेली नाही. मात्र स्टेशन डायरीत याबाबत नोंद केली गेली असल्याचं समजतंय. 

online fraud in vasai women ordered costly dress gets old sarees in return

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.