कामगार आणि कष्टकऱ्यांनाही आता ऑनलाईन मार्गदर्शन; वाचा बातमी सविस्तर

कामगार आणि कष्टकऱ्यांनाही आता ऑनलाईन मार्गदर्शन; वाचा बातमी  सविस्तर
Updated on

मुंबई ः कोरोनाच्या आक्रमणामुळे महानगरीतील अनेक स्थलांतरीत मजूर गावी निघून गेले, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सुरु झालेल्या अनेक प्रकल्पाच्या कामांवर परिणाम झाला. आता त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील कामगारांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. 

महाराष्ट्र सरकारने स्थानिक मजूरांना शिकवण्यासाठी सुरुवातीस ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी प्रॅक्टिकल मार्गदर्शनाबाबतही विचार सुरु असल्याचे वृत्त आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या पश्चिम विभागाने घेतलेल्या ऑनलाईन परिसंवादात उद्योग मंत्री नवाब मलिक यांनी ही माहीती दिली. 

स्थलांतरीत मजूर गावी गेल्याने नवे आव्हान निर्माण झाले. स्वयं सारख्या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक कामगारांना उद्योगासाठी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सुरुवातीस ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षण संस्थ्यांच्या मदतीने प्रॅक्टीकल ट्रेनिंग देण्यात येईल. अर्थातच यावेळी सुरक्षित अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. सौर उर्जा, ड्रोन, इलेक्ट्रिक वाहने यासारख्या नव्या क्षेत्रात काम करण्यासाठी लोकांना तयार करण्यावरही भर दिला जाणार आहे.

Online guidance to workers and toilers now; Read the news in detail

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.