पालिका रक्तपेढीत केवळ 100 युनिट रक्त

mumbai_municipal_corporatio
mumbai_municipal_corporatio
Updated on

मुंबई : मुंबईत रक्ताची आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रक्तदाते रक्तदानासाठी पुढे नाही आले तर मात्र ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्र मंडळांना रक्तदान शिबिरे आयोजित कऱण्याचे आवाहन करण्यात येतेय.

पालिकेच्या प्रमुख असणा-या सायन, नायर, केईएम, कूपर रूग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांतील रक्तपेढीत साधारणता 300 युनिटपेक्षा अधिक रक्त उपलब्ध असतं. मात्र सध्या हा आकडा वेगाने खाली आला असून आज केवळ 100 युनिट रक्त उपलब्ध आहे. पालिकेच्या राजावाडी, राज्य शासनाच्या सेंट जॉर्ज आणि कामा रूग्णालयाच्या रक्तपेढीत तर केवळ 50 युनिट रक्त उपलब्ध आहे.
 
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरूण थोरात यांनी सांगितले की, कोरोना संकटामुळे रक्त संकलन 50 टक्के कमी झाले आहे. कोरोनामुळे बाधित होण्याची भिती लोकांना वाटत आहे. त्यामुळे लोकं रक्तदान शिबिरांना फारसा प्रतिसाद देत नाहीत. यामुळे रक्ताची उपलब्धता कमी झाली आहे. छोट्या रक्त पेढ्यांनी आपल्या स्तरावर रक्तदान शिबिरे आयोजित कऱण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
 
सध्या मुंबईत जवळजवळ सर्वच रूग्णालयांत नॉन कोविड ओपीडी सुरू झाली आहे. मोठ्या शस्त्रक्रिया ही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रक्ताची आवश्यकता वाढली आहे. सध्या जिथे गरजेचे आहे तिथे रक्त पुरवण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र सध्या केवळ एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा बाकी आहे. रक्तदाते लवकर रक्तदानासाठी बाहेर आले नाहीत तर थॅलेसिमिया, हिमोफिलिया सह इतर आजारांतील रूग्णांना मोठी अडचण होऊ शकते. 

गणपती उत्सवात अनेक मंडळांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. त्यातून ब-यापैकी रक्त संकलन झाले होते. आता नवरात्री उत्सव तोंडावर आहे. त्यामुळे नवरात्रौत्सव मंडळांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन होऊ शकते असे आवाहन ही डॉ अरूण थोरात यांनी केले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.