मुंबईकरांना दिलासा; जंबो कोविड केंद्र झाली रिक्त, केवळ 200 रुग्ण दाखल

फक्त 4 केंद्रे सुरू ठेवणार, पालिकेचा निर्णय
 corona center
corona centersakal media
Updated on

मुंबई : मुंबईत कोविडचा आलेख (corona patients) घसरत चालला असून, आता जंबो कोविड केंद्र (Jumbo corona center) बंद होणार की नाही, या चर्चेला जोर आला आहे. महापालिकेच्या (bmc) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जंबो केंद्रांमध्ये केवळ 200 कोरोना रुग्ण आहेत, त्यामुळे आता केवळ 4 केंद्र सुरू ठेवण्यात येत असून, उर्वरित सर्व जंबो कोविड केंद्र पुढील आठवड्यापर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. कोविडच्या तिन्ही लाटांमध्ये (corona pandemic) जंबो कोविड केंद्रांनी मुंबईकरांना आधार दिला, परंतु आता ही केंद्रे रिक्त आहेत. अनेक केंद्रांमध्ये 40 पेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहेत. तर काहींमध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

 corona center
अजित पवारांची हिजाब प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले काही लोक...

तिसऱ्या लाटेत जंबो केंद्रांवरील सुमारे 80 टक्के खाटा रिकाम्या आहेत. सध्या नेस्को, बीकेसी, मुलुंड आणि कांजूरमार्ग केंद्रांमधील एक किंवा दोन वॉर्ड सक्रिय आहेत तर इतर सर्व स्टँडबायवर आहेत. नऊ जंबो सेंटर्समधील 16,473 बेडपैकी सुमारे 143 बेड किंवा एक टक्का पेक्षा कमी बेड्स व्यापलेले आहेत. नेस्को जंबो कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी सध्या आमच्याकडे केवळ 37 रुग्ण असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत, केंद्र बंद करण्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बीकेसी जंबो कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे म्हणाले की, आमच्याकडे फक्त 20 रुग्ण उपचार घेत आहेत. ही केंद्रे बंद ठेवायची की सुरू ठेवायची, याचा निर्णय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घेतील. मालाड कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत मिश्रा म्हणाले की, 30 जानेवारीलाच आमच्या शेवटच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता, त्यानंतर एकही रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी आला नाही. सध्या आम्हाला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जंबो कोविड केंद्रांची देखभाल खूप खर्चिक आहे. जागेचे भाडे, वीज, पाणी, कर्मचारी आदींच्या खर्चामुळे पालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे. त्यामुळे आता अनेक केंद्रे बंद होणार आहेत.

 corona center
सरकारची गरज ओळखून RBI ने जुळवून घेणारे धोरण स्वीकारलेय : गव्हर्नर दास

ही 4 केंद्रे सुरू करण्याबाबत चर्चा -

मुंबईतील बीकेसी, वरळीतील एनएससीआय, भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रुडास व मालाडमधील जंबो कोविड केंद्रे सुरू ठेवण्याबाबत आणि इतर केंद्रे बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व एकाच वेळी बंद होणार नाहीत.

विचारविनिमय केल्यानंतर निर्णय -

किती जंबो कोविड केंद्र सुरू राहतील, किती बंद राहतील यावर चर्चा सुरू आहे. रुग्ण सध्या कमीच आहेत, पण भविष्यात वाढले तर? केंद्रे बंद पडल्यास ती पुन्हा उभारण्यास वेळ लागेल.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

मुंबईची आकडेवारी (9 फेब्रुवारीपर्यंत)

एकूण चाचण्या- 156,51,624

एकूण पॉझिटिव्ह केसेस- 1,052,617

एकूण मृत्यू - 16,676

एकूण बरे - 1,029,006

दुप्पट दर - 840 दिवस

चाळ/झोपडपट्टी सील- 0

इमारती सील - 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.