Mumbai : ‘ऑपरेशन रीयुनाईट’अंतर्गत ४८७ बालकांची सुटका

हरवलेल्या मुलांसाठी मुंबई पोलिसांचा पुढाकार
Mumbai Police Reunite Operation
Mumbai Police Reunite Operation
Updated on

मुंबई : अपहरण, बेपत्ता किंवा हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन रीयुनाईट’ राबवले. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे ४५ दिवसांमध्ये १८ वर्षांखालील ४८७ मुलांची सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. तसेच गेल्या काही दिवसांत अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन महिन्यांच्या आणि एका वर्षाच्या लहान मुलांचीही सुटका केली.

‘ऑपरेशन रीयुनाईट’अंतर्गत केवळ अपहरण किंवा बेपत्ता झालेल्या बालकांनाच नव्हे, तर हरवलेल्या मुलांच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या नाहीत किंवा आढळल्या नाहीत, अशा मुलांचीही सुटका करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत २३० मुले आणि २५७ मुलींची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी ६८ मुले आणि १३५ मुलींच्या बेपत्ता झाल्याच्या पोलिसांकडे नोंदी होत्या. दुसरीकडे १५४ मुले आणि १२२ मुलींबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नव्हती. या मुलांनाही त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले.

गत आठवड्यात दोघांची सुटका

चार दिवसांपूर्वी ३० ऑक्टोबरला मुंबईतून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोन महिलांना गुन्हे शाखेने अटक केली. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी स्वत: गुरुवारी (ता. ३) मुलीची तिच्या आईसोबत भेट घडवून दिली. या मुलीचे ३० ऑक्टोबरला सांताक्रूझ येथून अपहरण करण्यात आले होते. तसेच गेल्या आठवड्यात दोन महिन्यांच्या मुलीची अँटॉप हिल परिसरातून सुटका केली.

काय आहे ‘ऑपरेशन रीयुनाईट’

1 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन रीयुनायट’ मोहीम सुरू केली. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत पोलिसांनी १८ वर्षांखालील बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेतला.

2 दीड महिना चाललेल्या या मोहिमेदरम्यान पोलिसांनी संशयास्पद स्थितीत आढळणारी मुले, रेल्वे स्थानक, बसस्थानक किंवा कचरा वेचण्याऱ्या मुलांबाबत माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.