मुंबई: ऑनलाईन अजान स्पर्धा आयोजित करणाऱ्या शिवसेना नेत्यांची वक्तव्ये म्हणजे त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये आल्यावर शिवसेनेला सातत्याने शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा आणि देशप्रेमाचा विसर पडत चालल्याचे चित्र आहे. ऑनलाईन अजान स्पर्धेबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे विधान हे शिवसेनेचे सत्तेनंतरचे बदलते स्वरूप स्पष्ट करणारे आहे. यात कहर म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा दाखला त्यात देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ आचार विचाराला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केल्याचेच हे द्योतक आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख प्रत्येक धर्म प्यारा असे बोलले असतील, मात्र त्यांची पालखी उचला असं ते कधीही बोलले नाहीत. पण सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाच्या भूमिकेत सरमिसळ झाल्याचे सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. तसेच मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला तसेच नेतृत्वाला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, हे याचेच द्योतक आहे, असेही दरेकर यांनी नमूद केले आहे.
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Opposition Leader Legislative Council Pravin Darekar criticizes Shiv Sena Ajaan contest
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.