मुंबई : राज्यात मॉन्सून आता सर्वदूर पसरला असून जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १४ जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्टही जाहीर करण्यात आला आहे. (Orange alert to Mumbai till July 14 a torrential downpour in ten districts in next three hours)
थोड्याशा पावसानंही मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचतं. यापार्श्वभूमीवर पुढील चोवीस तास मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत. कारण या काळात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारण ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इथं अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. (Mumbai Latest Marathi News)
मुंबईत मुसळधार पावसाबरोबरच सध्या ४० ते ५० किमी प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या तीन-चार तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथे, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या दहा जिल्ह्यांमध्ये साधारण ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.