स्कॉर्पिओचे मूळ मालक मनसुख हिरेन नाहीत, कोण आहे मग कारचे मालक? वाचा अधिक

स्कॉर्पिओचे मूळ मालक मनसुख हिरेन नाहीत, कोण आहे मग कारचे मालक? वाचा अधिक
Updated on

मुंबई: ठाणे येथे मृतदेह सापडला, ते मनसुख हिरेन हे अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मूळ मालक नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. ही कार सॅम न्यूटन नावाच्या व्यक्तीची आहे. कारच्या कामाचे पैसे न दिल्यामुळे ती कार ठेऊन घेतल्याचे जबाबातून स्पष्ट झाले आहे.

मनसुख यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, मनसुख यांचा कार अक्सेसरीजचा व्यवसाय आहे. मनसुख हे चार वर्षापासून सॅम न्यूटन  यांना ओळखत असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. सॅम न्यूटन यांनी त्यांच्या स्कॉर्पिओ मोटार कारच्या  अक्सेसरीजचे काम करण्याकरिता त्यांची मोटार कार मनसुखकडे 2018 मध्ये दिली होती. त्यावेळी स्कॉर्पिओ मोटार कारच्या अक्सेसरीजचे एकूण बिल दोन लाख 80 हजार झाले होते. त्यानुसार सॅम न्यूटन यांनी मनसुख यांना अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचे धनादेश मला दिल्याने मी त्यांची स्कॉर्पिओ मोटार कार ताब्यात दिली. मात्र यांनी दिलेले धनादेश मी जमा केले असता तो वठला नाही.

त्यानंतर 6 एप्रिलला 2018 मनसुख यांची ठाणे येथील विवियाना मॉलजवळ भेट घेतली. त्यावेळी कारचे पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मनसुख हे जवळच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी न्यूटन यांनी 15 दिवसांत पैसे देणार असल्याचे सांगितले, तरच कार तोपर्यंत तुमच्या ताब्यात ठेवा, तेव्हापासून मनसुख या कार वापरत आहेत. त्यानंतर 17 फेब्रुवारीला विक्रोळी पूर्व येथे कारची स्टेअरींग जाम झाल्यामुळे तेथेच सोडली. तेथून ती गायब झाली होती.

17 फेब्रुवारीला विक्रोळी येथे सोडून मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केट येथे एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती पवन ओस्तवाल होती. मनसुख यांनी दिलेल्या जबाबात नमुद केले आहे. ते त्यांचे व्यावसायिक मित्र आहेत. त्यांच्याच कारमधून मनसुख पुन्हा ठाण्यात आले, असे त्यांच्या जबाबात म्हटले आहे. विक्रोळी येथून चोरीला गेलेल्या याच स्कॉर्पिओ कारमध्ये पुढे जिलेटिन ठेवून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवण्यात आली होती.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

original owner the Scorpio is not Mansukh Hiren who is then the owner of the car

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.