ठाणे जिल्ह्यात भातावर करप्याचा प्रादुर्भाव ; झेडपी सीईओंकडून पाहणी

भातशेती पाहणी.
भातशेती पाहणी.
Updated on

ठाणे : गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने भात कापणीला पिकांचे नुकसान झाले. यंदा देखील झालेल्या पावसाने हाती आलेल्या पिक वाया जाणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी आनंदात होता. मात्र आता भातावर करपा रोगाचे प्रादुर्भाव वाढत असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. 


ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील कुंडनपाडा, उंबरमाळी, अजनुप गावात करपा व कडाकरपा रोगामुळे भात पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या घटनेची दखल घेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषि अधीक्षकाना दिले. दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.  काही दिवसांपूर्वी कृषि तज्ज्ञांची समिती गठीत करून या समितीची टीम प्रत्येक्ष घटनास्थळी येऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांचे अंदाजे 3.15 हेक्‍टर क्षेत्रावर किडरोग ग्रस्त झाल्याचे आढळून आले.

यावेळी समितीने कीड का लागली याचा अहवाल देत उपायोजना सुचविल्या आहेत. समितीने प्रत्यक्ष क्षेत्रावर भेट दिली असता, संबंधित शेतात पाणी साठल्याचे तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे करपा व कडाकरपा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. सीईओंच्या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम भगत, पंचायत समिती सदस्य राजेश कांबळे, उपसरपंच सचिन निचिते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, पंचायत समिती कृषि अधिकारी विलास घुले, तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके, आदी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. 

करपा व कडाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशी 
- निमगरवा व गरवा या भात जातीच्या वाणांवर ( उशीरा येणाऱ्या जाती ) ट्रायसायक्‍लोझोन 10 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात किंवा हेक्‍साकोनॅझोल 20 मिलि.प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
- शेतामध्ये जास्त प्रमाणात साचलेले पाणी बाहेर काढण्यात यावे. 
- या वर्षाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील वर्षी भात लागवड करण्यापूर्वी मिठाच्या द्रावणाची बीज प्रकिया करून त्यानंतर थायरम किंवा कार्बनडॅझिम 30 ग्रॅम प्रति 10 कि.ग्रॅ. बियाण्यावर बीज प्रकिया करावी व नंतरच बियाणे पेरावे. 
- केवळ युरीया या खताचा वापर न करता , समतोल प्रमाणात नत्र , स्फुरद व पालाश युक्त खतांचा वापर करावा. 
- अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरू होताच ताबडतोब कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड 25 ग्रॅम व स्ट्रप्टोसायक्‍लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व आसपासच्या सर्व भात उत्पादक शेतकऱ्यांना सुचीत करावे . 

Outbreak of taxa on paddy crop Thane district

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.